Latest News

6/recent/ticker-posts

कासार सिरसी केंद्रांतर्गत १९ शाळा पैकी ७ शाळाच चालू

कासार सिरसी केंद्रांतर्गत १९ शाळा पैकी ७ शाळाच चालू


उर्वरित शाळा चालू करण्यासाठी ग्रामपंचायत व वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या आदेशाची प्रतीक्षा

मदनसुरी:( प्रतिनिधी/फिरोज जागीरदार ) निलंगा तालुक्यातील कासार सिरसी केंद्रांतर्गत असलेल्या एकोणीस शाळेपैकी बारा शाळा कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर अद्यापही कुलूपबंद असून त्या चालू करण्यासाठी प्राथमिक आरोग्य उपकेंद्र कासार सिरसी व गावोगावच्या ग्रामपंचायतीच्या आदेशाची प्रतिक्षा करण्यात येत असल्याची माहिती केंद्रप्रमुख एल. एम.बोटले यांनी दिली. कोरोना महामारी च्या पार्श्वभूमीवर तब्बल दोन वर्षापासून बंद असलेल्या शाळा आता हळूहळू गजबजू लागले आहेत या केंद्रांतर्गत असलेल्या ५ माध्यमिक शाळा पैकी हलसी हत्तररगा येथील महाराष्ट्र विद्यालय, रामलिंग मुदगड येथील रामलिंगेश्वर विद्यालय व कोराळी येथील सोमलिंगेश्वर विद्यालय सुरू झाले असून प्राथमिक विभागात शिराढोण, सिरसी वाडी, कोराळी व कोरळवाडी येथील शाळा नियमांचे पालन करत वर्गात सुरक्षित अंतर ठेवत पूर्णपणे चालू करण्यात आले आहे तर येथील आश्रमशाळेसह उर्वरित बारा शाळा अध्याप बंदच असून चालू वर्गात पन्नास टक्के उपस्थिती असल्याचे सांगण्यात आले. बंद शाळा नियमित चालू करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी व ग्रामपंचायत यांच्या आदेशाची प्रतीक्षा करावी लागत आहे.ज्या गावात कोरोनाचा एक महिन्यापासून एकही रुग्ण सापडला नाही अशा गावात ग्रामपंचायतीच्या संमती नुसार शाळा चालू करता येतात असा नियम आहे तर गेल्या २२ तारखेला कासार सिरसी कोरोनामुळे एकाचा मृत्यू झाला त्यामुळे शहरातील शाळा चालू करण्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कोरोना हा लवकर न संपणारा आजार आहे त्यामुळे पुढील  संभाव्य सापडणारी रुग्ण संख्या विचारात घेऊन शासनाने नियमात शिथिलता आणून शालेय समित्या पालकांची संमती व शिक्षकांच्या जबाबदारीवर शाळा चालू करण्यास मान्यता द्यावी या अंतर्गत शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांची व शिक्षकांची दररोज गेटवर तपासणी करूनच त्यांना शाळेत प्रवेश देण्यात यावा शाळा सुटल्यानंतर त्या सर्वांची तपासणी करूनच घरी पाठवण्यात यावे याचा दैनंदिन अहवाल तयार करण्यात यावा असे मत येथील श्री करीबसवेश्वर शिक्षण संस्थेचे संचालक श्याम मुळजकर यांनी व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments