Latest News

6/recent/ticker-posts

कोकळगाव येथील अंगणवाडीत पूरक पोषण आहार सप्ताह साजरा

कोकळगाव येथील अंगणवाडीत पूरक पोषण आहार सप्ताह साजरा


मदनसुरी:(प्रतिनिधी/द्रोणाचार्य कोळी) बुधवार दि.१५ सप्टेंबर रोजी निलंगा तालुक्यातील कोकळगाव येथील अंगणवाडी मध्ये गरोदर माता व स्तनदा मातेसाठीचा पुरक पोषण आहार सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सरपंच गुरलिंग वाकडे, किशोर मंगणे, सिस्टर छाया जाधव, गावातील गरोदर माता, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा कार्यकर्त्या यांची उपस्थिती होती. गरोदर माता व स्तनदा मातेनी दररोजच्या आहारात जीवनसत्वयुक्त आहार घेणे अत्यावश्यक आहे.जेणे करून स्वतःची व आपल्या बाळाची आरोग्य सुदृढ बनेल, आहारामध्ये शेवग्याच्या शेंगा, पालक, टमाटे, कडीपत्ता, शेंगदाण्याचे लाडू, गूळ, संत्री, मोसंबी, पपई, मोड आलेले धान्य इत्यादी जीवनसत्व युक्त फळभाज्याचे वापर करावे, नेहमी प्रसन्न रहावे, तणावमुक्त जीवन जगावे आपल्या आरोग्यविषयक समस्या अंगणवाडी ताई व आरोग्य वर्धिनी केंद्रात येऊन सांगावे, वेळेवर लसीकरण करून घ्यावे, सर्वांनी कोविडची लस न घाबरता घ्यावी असे आवाहन अंगणवाडी ताई दैवशाला सगर यांनी केले. यावेळी बबिता सगर, अनिता सगर, संगीता बनसोडे, संगीता सुर्यवंशी कावेरी सुर्यवंशी, श्वेता लाटे, शिवकन्या बनसोडे, यास्मिन शेख, मनोज सगर  व स्तनदा माता यांची उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments