ननंद येथे " ई पिक पहाणी " कार्यक्रम संपन्न.
निलंगा:(विशेष प्रतिनिधी/इरफान शेख) तालुक्यातील मौजे. ननंद येथे "ई पिक पहाणी" कार्यक्रम महसूल विभागाच्या मदतीने व युवासेनाच्या साह्याने संपन्न झाला. महाराष्ट्र शासनाने "ई पिक पहाणी" नोंदणी ॲपच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्यांनी आपला पिक पेरा नोंद करायचा आहे. त्यासाठी प्रत्येक शेतकर्याने आपल्या मोबाईलच्या माध्यमातून पिक पेरा नोंदणी कशी करावी, यासंबंधी माहिती देण्यासाठी निलंगा तालुक्यातील ननंद येथे युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रा.आण्णासाहेब मिरगाळे यांच्या सहकार्याने व महसूल विभागाच्या माध्यमातून तलाठी ननावरे यांनी पिक पेरा कसा नोंद करावा याचे प्रात्यक्षिक सर्व शेतकरी यांच्यासमोर सादर केले व तसेच प्रत्यक्षात शेतात जाऊन सर्व शेतकऱ्यांना पीक पेरा नोंदणी करून दाखवली यावेळी युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रा.आण्णासाहेब मिरगाळे, बालाजी लादे, नामदेव मेह्त्रे, सुधाकर नारायणपुरे ,उद्धव जाधव, व्यंकट पाटील, विलास देशमुख, राम लादे, सागर नारायणपुरे , सतीश लादे, राजकुमार तांबाळे, ई शिवसैनिक व गावातील अनेक शेतकरी उपस्थित होते.

0 Comments