खरीप पिकाचे सरसकट पंचनामे करून विमा कंपनीने शेतकऱ्यांना दिलासा द्यावा;अन्यथा तीव्र आंदोलन
निलंगा:(विशेष प्रतिनिधी/इरफान शेख) लातूर जिल्ह्यात गेल्या आठवड्यात जोरदार पावसासह काही भागात अतिवृष्टी झाली अनेक भागात ढगफुटीचे प्रकार घडले सोयाबीन पिकावर करपा सारखा रोग पडल्यामुळे सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. पिकाच्या झालेल्या नुकसानी ची नोंद 72 तासांमध्ये विमा कंपनीला करावे लागते ऑनलाईन माहिती देण्यात शेतकरी हतबल झाला आहे व काही गरीब शेतकरी ऑनलाईन तक्रार नोंदणी करू शकत नाहीत त्यामुळे विमा योजनेच्या लाभापासून हजारो कोस दूर आहेत. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान लक्षात घेऊन शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी शासनाने पिक विमा योजना सुरू केली आहे या योजनेनुसार नुकसानीत असलेल्या शेतकऱ्याला विमा कंपनीकडून मदत मिळणे क्रमप्राप्त आहे तेव्हा गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसानीचे पंचनामे न करता सरसकट विमा देण्यात यावा त्याच बरोबर हाता तोंडाला आलेले सोयाबीनचे पीकावर फार मोठ्या प्रमाणात करपा रोग पडल्यामुळे सोयाबीन उत्पादन अतिशय कमी होऊन शेतकरी पुन्हा एकदा संकटात लोटला जाणार आहे त्यासाठी शासनाने विमा कंपनी चा आदेश देऊन सरसकट पंचनामे करून शासनाने त्वरीत अनुदान द्यावे. अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा आज निलंग्याचे तहसीलदार यांना निवेदनाद्वारे देण्यात आले. निवेदन व करपा रोगामुळे नुकसान झालेले सोयाबीनचे पीक पेंडी शेतकरी कुमोद लोभे, युवराज पवार यांच्या हस्ते देण्यात आले. याप्रसंगी निलंगा नगरपालिकेचे नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे, भारतीय जनता पार्टीचे लातूर जिल्हा उपाध्यक्ष शेषराव ममाळे, भारतीय जनता पार्टीचे निलंगा शहर अध्यक्ष ऍड.विरुद्ध स्वामी ,ओबीसी युवा मोर्चा चे मराठवाडा संपर्कप्रमुख शरद पेटकर, तालुका अध्यक्ष नामदेव काळे, शहराध्यक्ष भाऊसाहेब जाधव, भाजपचे पंचायत समिती सदस्य काळेसाहेब, उपाध्यक्ष युवराज पवार, सरचिटणीस कमोद लोभे, पिंटू पांचाळ, शफिक सौदागर ,माधव पटणे, तमन्ना माडीबोने, तुकाराम माळी, मंचक पांचाळ ,भगीरथ वरवडे, दिगंबर जाधव ,विष्णुपंत आतरेड्डी, खादीम मिनाज ,डॉक्टर जब्बार सौदागर ,आकाश पेठकर, प्रशांत पाटील ,आसामी आतार ,नगरसेवक अविनाश बिराजदार ,अर्जुन पौळ आदी प्रमुख पदाधिकारी सह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

0 Comments