Latest News

6/recent/ticker-posts

नळेगाव येथील नदीकाठचे सोयाबीन पाण्याखाली

नळेगाव येथील नदीकाठचे सोयाबीन पाण्याखाली


नळेगाव:( प्रतिनिधी/बाळासाहेब बरचे ) नळेगाव येथे रविवार व सोमवार रात्री दहा ते पहाटे ५:०० वाजेपर्यंत दोन दिवसात ५७ मिमी झालेल्या मुसळधार पावसामुळे उरलेसुरले सोयाबीन पाण्यात गेले. शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.तरी शासनाने ताबडतोब नुकसान सोयाबीनचे पंचनामे करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत करावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. अगोदरच सोयाबीनचे भाव कोसळल्याने शेतकरी संकटात सापडला असून त्यावर २ दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे काढणीस आलेले घरणी नदीकाठच्या हटकरवाडी,उकाचीवाडी या भागातील बहुतांश शेतकऱ्यांचे सोयाबीन पाण्यात गेल्यामुळे शंभर टक्के वाया जाणार आहे. शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. गेल्या महिन्यात सोयाबीनचा दर दहा हजारी पार झाला होता.त्यामुळे काढणीचे भावसुद्धा एकरी चार ते पाच हजार रुपये झाले.पेट्रोल डिझेलच्या वाढीमुळे नाग्रानीसुद्धा भाव यावर्षी मोठ्या प्रमाणात वाढले होते.परंतु दहा हजार भाव झाल्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांना सोयाबिनमुळे थोडा बहुत नफा मिळण्याची आशा होती. पेरणीनंतर जवळपास २५ दिवसांचा मोठा खंड पडल्यामुळे सोयाबीनचे फुलं गळून गेली होती.त्यानंतर झालेल्या पावसामुळे कसे बसे थोड्याबहुत शेंगा लागल्या होत्या.आता याला तरी चांगला भाव मिळेल या आशेने शेतकरी खुश होते.परंतु पावसामुळे सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.त्यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागणार आहे. याबाबत युवा शेतकरी समाधान बाराते  म्हणाले यावर्षी नांगरणीचे भाव अठराशे रुपये व आता सोयाबीन काढणीला एक बॅगला चार ते पाच हजार रुपये मजूर मागत आहेत.रात्री झालेल्या पावसामुळे  शेतातील सोयाबीन पाण्याखाली गेल्यामुळे आता ते काढणे फार अवघड आहे.त्यामुळे शासनाने ताबडतोब पंचनामे करून घ्यावे असे चाकूर तहसीलदार डॉ.शिवांनंद बिडवे यांनी नळेगावचे तलाठी अविनाश पवार यांना सूचना दिल्या. शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी व विमा कंपनीला आदेश देऊन ताबडतोब शेतकऱ्यांना विमा मंजूर करून तो वाटप करण्यात यावा.त्यामुळे तरी शेतकऱ्यांची दिवाळी गोड होईल अशी भावना शेतकरी महादेव बिराजदार यांनी व्यक्त केली.

Post a Comment

0 Comments