Latest News

6/recent/ticker-posts

वाजरखेडा शिवारातील सालगडी शिवाजी कुदरेला सुखरूप पुरातुन बाहेर काढले

वाजरखेडा शिवारातील सालगडी शिवाजी कुदरेला सुखरूप पुरातुन बाहेर काढले


निलंगा:( प्रतिनिधी/रमेश लांबोटे ) निलंगा तालुक्यातील मुगाव-मसलगा ता. निलंगा गावच्या हद्दीवर शिरूर अनंतपाळ तालुक्यातील वांजरखेडा शिवारातील शेतकरी गोविंद जाधव व उध्दव शेळके रा. लातूर यांची शेतजमीन आहे. त्यांच्या शेतात शिवाजी भिमराव कुदरे रा. देगलूर जिल्हा नांदेड हा सालगडी म्हणून आपल्या कुटुंबासह शेतात राहत होता. जोरदार पाऊस व मांजरा धरणानाचे सर्व दरवाजे उघडण्यात आल्याने मांजरा नदीला पुर आला असता दि. २८ सप्टेंबर रोजी ५:०० वाजता कुटुंबीयांना सुरक्षित ठिकाणी हलवले व पाणी जास्त वाढणार नाही म्हणून शिवाजी कुदरे शेतातच थांबला. व रात्री पाणी वाढत असल्याचे पाहून शेतातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला असता पाण्याने चहुबाजूने वाढल्याचे लक्षात येताच सालगडी शिवाजी ने मुगाव चे माजी सरपंच तथा निटूर जिल्हा परिषद गटाचे सदस्य प्रतिनिधि सुरेंद्र धुमाळ यांना फोन करून पुराच्या पाण्यात अडकल्याचे सांगितले. सुरेंद्र धुमाळ यांनी निलंग्याचे तहसीलदार गणेश जाधव यांना तात्काळ या घटनेची माहिती सांगितली. सदरील घटनेची माहिती मिळताच तहसीलदार गणेश जाधव या तलाठी मंडळ अधिकारी यांच्याशी चर्चा केली. व मदतीच्या सुचना केल्या. सर्वांनी शिवाजीसोबत रात्री फोनवर संपर्क करून धीर दिला. व सकाळी बाहेर काढण्याची माहीती दिली. मागील १० वर्षापूर्वी याच ठिकाणी मांजरा नदीच्या पुरात सालागडी अशाच पध्दतीने अडकला होता. दि. २९ सप्टेंबर रोजी सकाळी ७:०० वाजता निलंग्याचे  तहसीलदार गणेश जाधव हे मंडळ अधिकारी राजकुमार देशमुख, तलाठी प्रविण कस्तुरे, तलाठी अर्चना चौहान, वांजरखेडा तलाठी कवडे आदीसह बचाव कार्यासाठी टीम घेऊन मसलगा मुगाव शिवरस्त्यावर घटनास्थळी पोहचले व बचाव पथकातील जवानानी शिवाजी कुदरे या सालगड्याला १० तासानंतर बोटीद्वारे पुरातुन सुखरूप बाहेर काढले. व मसलगा येथील शेतकरी दगडु रामा आरेराव यांची गाय व म्हैस सुरक्षित ठिकाणी हलवली. पुरातुन बाहेर येताच तहसीलदार गणेश जाधव यांनी शिवाजीचे स्वागत केले व विचारपूस केली. तसेच उपस्थित नागरिकांना पुर परिस्थितीत सावधान राहण्याचे आवाहन केले. यावेळी बचाव कार्य संपल्यानंतर बचाव पथकास लातूर जहिराबाद हायवे वरून घटना स्थळावर साहित्य ने आण करण्यासाठी जि.प. सदस्य प्रतिनिधी सुरेंद्र धुमाळ, मसलगा सरपंच प्रतिनिधी रमेश पाटील, पत्रकार परमेश्वर शिंदे, माधव शिंदे, रमेश शिंदे, रविकिरण सुर्यवंशी मगावचे चेअरमन दिनकर शिंदे, रावळाजी शिंदे, डुगल शिंदे, कमलाकर शिंदे, निखील शिंदे, सागर शिंदे, खंडेराव वाडीकर, विशाल वाडीकर, रफीक शेख, मुक्तार शेख व मसलगा येथील सतीष जाधव, बबन चामे, माणिक पिंड आदी शेतकर्‍यांनी सहकार्य केले.

Post a Comment

0 Comments