शिरोळ गावचा संपर्क तुटला..
शिरोळ:(प्रतिनिधी/सलीमभाई पठाण) सततच्या पावसामुळे आणी मांजरा धरणातुन मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरु असल्यामुळे निलंगा तालुक्यातील शिरोळ गावचा संपर्क तुटला आहे. सध्या शिरोळ-निटूर,शिरोळ-अंबुलगा,शिरोळ-वलांडी रस्त्यावरुन पाणी वाहत असल्यामुळे शिरोळचा संपर्क तुटला आहे. सध्या पाऊस थांबल्यामुळे काही तासानंतर पुराचं पाणी ओसरल्यानंतर वाहतुक सुरळीत होईल अशी आशा आहे. या पुरामुळे शिरोळ परिसरातील शेतीचं मोठ्या प्रमाणात नूकसान झालं असुन शासनाने कागदी घोडे न नाचवता,आॅनलाईनच्या विळख्यात न अडकविता बळीराजाला प्रशासनाच्या संबंधित आधिकाऱ्यांनी सरसकट पंचनामे करुन मदत जाहिर करावी अन्यथा आंदोलन उभारु अशी मागणी परिसरातील सर्व शेतकरी बांधवांनी केली आहे.


0 Comments