Latest News

6/recent/ticker-posts

मांजरा नदी पट्ट्यातील माचरटवाडी-बसपुर शेतकऱ्याचे सोयाबीन पाण्याखाली; शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान

मांजरा नदी पट्ट्यातील माचरटवाडी-बसपुर शेतकऱ्याचे सोयाबीन पाण्याखाली; शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान


प्रशासनाने ऑनलाईन ऑफलाईन अर्ज करण्याच्या या प्रक्रियेमध्ये शेतकऱ्यांची मोठी हानी होणार आहे सरसकट पंचनामे करून नदीकाठच्या लोकांना तात्काळ मदत द्यावी. माचरटवाडी येथील शिवारातील सतीश लांबोटे,मोहन नरवटे,लहू चव्हाण,कुमार भदरगे,आशोक चव्हान, राजू नरवटे,व्यांकट नरवटे, माधव भदरगे,पुरूषोत्तम चव्हाण,व्यांकट चीत्ते ,बालाजी लांबोटे, कीसन नरवटे, शेषराव चेव्हान या शेतकऱ्याचे पूर्ण सोयाबीन पाण्याखाली असल्याने कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे.- रमेश लांबोटे, माचरटवाडी( मांजरा नदीकाठचे शेतकरी)


शिरोळ:(सलीमभाई पठाण) तालुक्यात मागील दोन-चार दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे व मांजरा नदीवरील प्रकल्पातून पाणी सोडल्याने मांजरा नदीला पुर आल्यामुळे मांजरा नदी काठची तालुक्यातील निटुर, शेद, मुगाव या भागातील शेती व त्याला लागून असलेल्या ओढ्याकाठची संपूर्ण शेती जलमय झाली आहेत. उभ्या पिकांत पाणी शिरल्याने तालुक्यातील हजारो हेक्टर वरील पिके पाण्यात सध्या पाण्यात आहेत, वर्षभर रामराव मेहनत करून पिकवलेला शेतकऱ्याचा पिक हाता तोंडाशी आलेला घास या नैसर्गिक व कृत्रीम संकटाने हिरावला गेला आहे. सप्टेबर मध्ये सततच्या दमदार पावसाने जिल्ह्सरतील लघुंिसचन, साठवण व पाझर तलाव, मध्यम प्रकल्प, मांजरा नदीवरील धनेगाव प्रकल्प व बॅरेज तुडूंब भरले आहेत.परिणामी पाणी अधिक झाल्याने प्रकल्पातून मांजरा नदी पाणी सोडण्यात आले, त्यात तालुक्यातील प्रकल्प व नदी, नाले वाहत असल्याने मांजरा परिसर अक्षरश: जलमय झाला असून हजारो हेक्टर वरील पिके पाण्यात गेल्याने खरीप हंगाम धोक्यात आले आहे. मांजरा नदीपात्रात पाणी जास्त झाल्याने ते नदी बाहेर पडले असून मांजरा काठच्या फकरानपूर, वांजरखेडा,हालकी, डोंगरगाव, उजेड बिबराळ, बाकली यांसह राणी अंकुलगा शिवारातील शेतात पूर स्थितीने हजारो हेक्टरवरील पिके पाण्याखाली आली असून काढणीला आलेले हजारो एकर वरील नदीकाठचे सोयाबीन हे पाण्याखाली गेले आहे यात प्रामुख्याने शेंद, निटूर, ढोबळेवाडी मांजरवाडी, बस्पूर या गावाचा व शिवाराचा समावेश आहे. आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर तथा काँग्रेस प्रदेश सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर यांनीही या भागाच्या नुकसानग्रस्त शिवाराची पाहणी केली आहे आता मदतीकडे शेतकऱ्याचे प्रतीक्षा लागली आहे. पंचनामे करून सरसकट नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी परिसरातील शेतकरी करत आहेत. या पुरामुळे हजारो हेक्टरवरील खरीप पिके पाण्यात गेली असून खरीप हंगाम धोक्यात येऊन शेतकरी कर्जबाजारी होऊन परत हा हताश झाला आहे.

Post a Comment

0 Comments