Latest News

6/recent/ticker-posts

भादा येथे वीज पडून शेतकरी महिला मृत्युमुखी; कुटुंबाला 4 लाख रु आर्थिक मदत सुपूर्त

भादा येथे वीज पडून शेतकरी महिला मृत्युमुखी; कुटुंबाला 4 लाख रु आर्थिक मदत सुपूर्त


बी डी उबाळे

औसा: तालुक्यातील भादा येथील शिवारात शेतकरी महिला गुरुवार दि 23 सप्टेंबर 2021 रोजी कुटुंबासोबत शेतातील सोयाबिंन काढणी सुरु होती तेव्हा दुपारी 3;30 च्या सुमारास विजेचा प्रचंड कडकडाट होऊन वीज पडून शशिकला सिताराम गवळी वय 55 वर्ष जागीच मृत्युमुखी पडल्या होत्या. याबाबत प्रशासनाला ताबडतोब कळविल्याने त्याठिकाणी भादा सजाचे तलाठी माने आणि मंडळ अधिकारी पटेल यांनी ताबडतोब पंचनामा करून कुटुंबाला आर्थिक मदत मिळणे कामी पंचनामा तहसील कार्यालयात सादर केला आणि मदत मिळणे कामी प्रयत्न केले. सोबतच गावातील सामाजिक कार्यकर्ते, गाव पुढारी आणि नुकताच औसा तहसीलदार पदाचा पदभार घेतलेले  कर्तव्यदक्ष तहसीलदार भरत सूर्यवंशी यांच्या प्रयत्नामुळे भादा ता औसा येथील गवळी कुटुंबाला मंगळवार दि 28 सप्टेंबर 2021 रोजी म्हणजे अवघ्या पाच दिवसांमध्ये या नैसर्गिक आपत्ती ग्रस्त कुटुंबाला 4 लाख रुपयांचा आर्थिक आधार मयत शशिकला गवळी यांचे पती सीताराम गवळी यांच्या हातांमध्ये सुपूर्त करण्यात आला यावेळी तहसीलदार भरत सुर्यवंशी, म.अ. भुजबळ, तलाठी बी आर. माने, उपसरपंच बी एम शिंदे, दिलीप गवळी, रामेश्वर माळी आदी उपास्थित होते.

Post a Comment

0 Comments