Latest News

6/recent/ticker-posts

चाकुर शहरातील शेतकऱ्यांनी ई-पिक पेरा भरण्यात अल्प प्रतिसाद

चाकुर शहरातील शेतकऱ्यांनी ई-पिक पेरा भरण्यात अल्प प्रतिसाद 


लवकर ईपिक पेरा भरावा नवनाथ खंदाडे तताठी चाकुर

चाकुर:(ता.प्रतिनिधी/ सलीमभाई तांबोळी) महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांनसाठी ई-पिक पेरा आपल्या ७/१२ वर अॉनलाईन नोंदी बंधनकारक केली आहे.शेतकऱ्यांना यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन केले जात आहे.शहरातील ज्या शेतकऱ्यांनी ई-पिक पेरा नोंद केला नाही त्यांनी ईपिक पेरा लवकर नोंद करावा असे आहवान चाकुर तलाठी सज्जाचे तलाठी नवनाथ खंदाडे यांच्या वतीने करण्यात आली आहे.शहरात शेतकऱ्यांना ईपिक पेरा माहिती देण्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाऊन जनजागृती करण्यात येत आहे.शेतकऱ्यांना ईपिक पेरणी अॉनलाईन भरताना काही अडचण आली तर त्यांनी तलाठी कार्यालयात संपर्क करण्यांचे आहवान करण्यात आले आहे.यापुढे शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी ई-पिक पेरा नोंदणी बंधनकारक आहे.पिककर्ज,विमा,शासनाचे अनुदान,शेतीसाठी कोणत्याही योजना राबविण्यासाठी आपल्या ७/१२ वर ई-पिक पेरा नोंदणी असे आवश्यक आहे. ई-पिक पेरा नोंद असणाऱ्या शेतकऱ्यांनाचा शासनाच्या योजनेचा लाभ होणार आहे.चाकुर सज्जाच्या शेतकऱ्यांनी अल्पप्रतिसाद दिला आहे.शेतकऱ्यांनी आपली ई-पिक पेरा नोंदणी लवकर करावी. चाकूर मध्ये एकूण 1600 खातेदार असून त्यापैकी केवळ 474 खातेदारांनी म्हणजे 25%लोकांनी e पीक द्वारे माहिती भरली  आहे. दवंडी दिली आहे, pomplet वाटले आहेत प्रचार, प्रसिद्धि ,प्रोबधन सुरू आहे तरी सर्वांनी आपला पीक पेरा इ पीक app द्वारे भरून घ्यावा ही शेतकऱ्यांनी आपली माहीत आपणच स्वतःह भरावयाची आहे.आपले क्षेत्र किती व आपण आपल्या क्षेत्रात कोणती पेरणी केली आहे.आपल्या शेतात झाडे, बोआर, विहिरी नोंद करावी.अंतिम तारीख 30/09/2021- चाकुर 474,चापोली 320, जगळपुर 174, जढाळा 454, जानवळ 1029, झरी (खु) 355,झरी (बु)417,टाकळगांव  (शे)89,डोंग्रज 333, तळघाळ 72,तिर्थवाडी 175,तिवघाळ 195,तिवटघाळ 183,दापक्याळ 188,देवग्रा 594,देवाग्रावाडी 131, नळेगांव 1824, अशी चाकुर तालुक्यात शेतकऱ्यांनी ई पिक नोंदणी केली आहे.चाकुर शहरात केवळ २५% शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे.राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांनी लवकर नोंदणी करावी असे आहावान नवनाथ खंदाडे तलाठी चाकूरच्या वतीने करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments