Latest News

6/recent/ticker-posts

त्या रात्रीच्या अपघातानंतर निटुर येथील महामार्ग रस्ता दुभाजकावर बसवले दिशादर्शक फलक

त्या रात्रीच्या अपघातानंतर निटुर येथील महामार्ग रस्ता दुभाजकावर बसवले दिशादर्शक फलक


निलंगा:( प्रतिनिधी/रमेश लांबोटे ) तालुक्यातील निटुर येथे लातूर ते जहीराबाद महामार्गावर गावामध्ये रस्ता दुभाजक बसवले असून त्यावर दिशादर्शक फलक नसल्याने बुधवारी सायंकाळी सात वाजता मुगाव हून निटूर च्या दिशेने येणाऱ्या दुचाकीचा निटुर गावचा सुरुवातीला लागणाऱ्या रस्ता दुभाजकावर दिशादर्शक फलक नसल्याने अपघात होऊन शिरूर गावचे सचिन बंडगर व कोमल रुपनार या दोघांचा अपघात होऊन त्यांना गंभीर जखम झाली होती यामुळे स्थानिक नागरिकांनी महामार्ग बनवणाऱ्या कंपनीचे वाहने टिप्पर आडवून दुभाजकावर व रस्त्यावर दिशादर्शक फलक रेडियम चा वापर करावा अशी मागणी केली होती त्यांच्या मागणीला यश आले असून आज शुक्रवारी या अपघाताच्या ठिकाणी दिशादर्शक फलक महामार्ग कंपनीच्या वतीने लावण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे यामुळे आता वाहनधारकांना रस्त्याचा अंदाज लागणार आहे.

Post a Comment

0 Comments