प्रा. सूर्यकांत वाकळे यांना पीएचडी पदवी प्रदान
निलंगा: येथील महाराष्ट्र महाविद्यालयातील वाणिज्य विभागात कार्यरत असलेले प्रा. सूर्यकांत वाकळे यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड अंतर्गत वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र शाखेतून पीएचडी अर्थात विद्यावाचस्पती पदवी प्रदान करण्यात आली. त्यांनी "अ स्टडी ऑफ कन्झ्युमर बिहेविअर अँड मार्केटिंग ट्रेंड्स ऑफ सिलेक्टेड कन्झ्युमर प्रॉडक्टस इन लातूर डिस्ट्रिक्ट" या विषयावर डॉ. नागनाथ जाधव आणि डॉ. कन्हैया पाटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आपले शोधकार्य पुर्ण करुन विद्यापीठास प्रबंध सादर केलेला होता. त्यांच्या या यशाबद्दल महाराष्ट्र शिक्षण समितीचे अध्यक्ष विजय पाटील निलंगेकर, संस्थेचे सचिव बब्रुवान सरतापे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव कोलपुके, उपप्राचार्य डॉ. चंद्रकुमार कदम, वाणिज्य विभागप्रमुख डॉ. अरुण धालगडे, डॉ. नरेश पीनमकर, डॉ. राहुल डोंबे, महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले. तसेच स्वा.रा.ती.मराठवाडा विद्यापीठ, नांदेड वाणिज्य आणि व्यवस्थापनशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. वसंत भोसले, डॉ. रमाकांत घाडगे, डॉ. हरिश्चंद्र पतंगे, डॉ. संजय अग्रवाल, डॉ. संभाजी जाधव आदि मान्यवरांनी विशेष अभिनंदन केले आहे.

0 Comments