Latest News

6/recent/ticker-posts

डेंग्यू, मलेरिया उपाय योजना म्हणून भादा ग्रामपंचायतकडून धूर फवारणीचे नियोजन पूर्ण

डेंग्यू, मलेरिया उपाय योजना म्हणून भादा ग्रामपंचायतकडून धूर फवारणीचे नियोजन पूर्ण


बी डी उबाळे

औसा: तालुक्यातील भादा येथे सध्या मोठ्या प्रमाणात डास निर्मिती केंद्र झाल्याचे दिसून येत आहे, यामुळे ग्रामपंचायत भादाकडून दिनांक 3 सप्टेंबर 2021 वार शुक्रवार रोजी धूर फवारणी यंत्र दुरुस्ती करून फवारणीचे नियोजन करण्यात आले आहे. लातूर जिल्ह्यामध्ये सध्या डेंगू, मलेरिया आदी सह संसर्गजन्य रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत असून जिल्ह्यात आणि तालुक्यात या संसर्गजन्य रोगाचे प्रमाण वाढले असून आपल्या गावामध्ये अशाप्रकारचे रुग्ण आढळून येऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून ग्रामपंचायत कडून धूर फवारणी करण्यासाठी यंत्रणा सज्ज झाली असून येत्या एक-दोन दिवसांमध्ये संपूर्ण गावांमध्ये धूर फवारणी करण्यात येणार असल्याचे ग्रामविकास अधिकारी माणिक सूर्यवंशी यांनी सांगितले. मागील आठवडाभरापासून ग्रामपंचायत मध्ये सर्व सदस्यांची बैठक होऊन हा धूर फवारणी निर्णय घेण्यात आला असून या दुर फवारणीसाठी ही गावातील अनेक सामाजिक कार्यकर्त्याकडून वारंवार सूचना करण्यात येत होती परंतु फारुख या एका कार्यकर्त्याने लेखीही सूचना देण्यात आली असल्याचे समजते.

Post a Comment

0 Comments