Latest News

6/recent/ticker-posts

शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांच्या हस्ते रमाई घरकुल योजनेच्या बांधकामास सुरुवात

शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांच्या हस्ते रमाई घरकुल योजनेच्या बांधकामास सुरुवात


मदनसुरी:(प्रतिनिधी/द्रोणाचार्य कोळी) निलंगा तालुक्यातील मदनसुरी येथील रमाई आवास योजने अंतर्गत 51 घरकुल मंजूर झाले असून आज शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांच्या हस्ते सदरील घरकुल बांधकामास सुरुवात करण्यात आले.त्यांच्या हस्ते शिंदे भारतबाई संभाजीराव यांच्या घरकुलाचे भूमिपूजन करून घरकुलाचे बांधकाम चालू करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य अशोक सूर्यवंशी, दिलीप जाधव, अशोक जाधव , माधव शिंदे, अभय गायकवाड, व्यंकट, राजे गुलाब माने, सुरेश चाफेकर, विलास विहिरे, राजकुमार जाधव गावातील प्रतिष्ठित नागरिक धोंडीराम जाधव, माजी सैनिक धनराज जाधव, वरून जाधव, धनराज लांडगे, आकाश शिंदे, दीपक शिंदे व गावातील शिवसैनिक यांची उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments