आनंदवाडी येथे मनसे च्या सरपंच निवडीबरोबर विकासकामांचा नारळ फुटला
चाकूर:(प्रतिनिधी/सलीम भाई तांबोळी) तालुक्यातील आनंदवाडी येथे चौदाव्या वित्तआयोगाच्या अंतर्गत विकासकामांचा शुभारंभ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष डॉ नरसिंह भिकाणे साहेब यांच्या हस्ते नारळ फोडून झाला. चार दिवसांपूर्वी च ह्या ग्रामपंचायत च्या सरपंच पदी मनसेच्या मीरा हनुमंत पस्तापुरे तर उपसरपंच पदी मदन आरदवाड हे निवडून आले. निवडणूक जिंकल्यानंतर आनंदवाडी चा विकास हाच आमचा ध्यास असे जिल्हाध्यक्ष डॉ भिकाणे यांनी सांगितले होते व त्याचीच अमलबजावणी करत रस्त्यांच्या कामाला सुरुवात झाली आहे त्याबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. रस्ते, पाणी, वीज, स्वच्छता यावरती लक्ष केंद्रित करत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आनंदवाडी ग्रामपंचायत ला महाराष्ट्रातील दुसरे हिवरे बाजार बनवणार असल्याचे मनोगत यावेळी सरपंच हनुमंत पस्तापुरे यांनी व्यक्त केले. यावेळी सरपंच(पती) हनुमंत पस्तापुरे, मनसे तालुकाध्यक्ष सुरेश शेवाळे, सचिव राहुल आरदवाड, नंदकुमार सुडे, आवसकर सर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

0 Comments