Latest News

6/recent/ticker-posts

विविध उपक्रमाने कासार सिरसी सह परिसरात मराठरवाडा मुक्तिसंग्राम दिन साजरा

विविध उपक्रमाने कासार सिरसी सह परिसरात मराठरवाडा मुक्तिसंग्राम दिन साजरा



कासार सिरसी:(प्रतिनिधी/द्रोणाचार्य कोळी) निलंगा तालुक्यातील कासार सिरसी सह परिसरात मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त येथील शिवाजी चौकात औषधाचे तरुण व्यापारी उमाकांत मनोहरराव पाटील यांच्या हस्ते सार्वजनिक ध्वजा वंदन करण्यात आले तर येथील आधार वृद्धाश्रमामध्ये अध्यक्ष सौ मनीषाताई होळकुंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वातंत्र्य सैनिकाचे ज्येष्ठ पाल्य श्याम मुळजकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यानिमित्त वृद्धाश्रमातील निराधार लोकांना मिष्ठान्न भोजन देण्यात आले. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त येथील श्रीकरी बसवेश्वर विद्यालयाचे सचिव शिवदर्शन चिंचणसुरे यांच्या हस्ते स्वातंत्र्य सैनिक कै. बाबुराव(काका) चिंचणसुरे व पंडितराव मुळजकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तर मुख्याध्यापक सौ सविता मुरूमकर यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले यानिमित्त ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच सौ दिपाली पांचाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले येथील पोलीस स्टेशन, जिल्हा परिषद शाळा, उर्दू शाळा, बँका, सर्व सरकारी कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आले. स्वातंत्र्याच्या लढ्यासाठी केलेल्या त्यागाची गाथा पुढील पिढीला माहिती व्हावी यासाठी मुक्ती संग्रामाच्या इतिहासाचा अभ्यासक्रमात समावेश करण्यात यावा त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांचे पुतळे उभारण्यात यावेत स्वातंत्र्यसैनिकांच्या धरतीवर त्यांच्या ज्येष्ठ पाल्यास स्वातंत्र्यसैनिकांचा दर्जा देण्यात यावा अशी मागणी मूळजकर यांनी केली. परिसरात रामलिंग मुदगड, मदनसुरी, कोकळगाव, सरवडी, हडोळी, मुदगड एकोजी आदी गावातील ग्रामपंचायत व जिल्हा परिषद शाळेत विविध मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

Post a Comment

0 Comments