Latest News

6/recent/ticker-posts

दोन मोटारसायकलच्या विचित्र धडकेत एक जण जागीच ठार

दोन मोटारसायकलच्या विचित्र धडकेत एक जण जागीच ठार


बी डी उबाळे

औसा: दि. 16 सप्टेंबर रोजी सायंकाळी चारच्या सुमारास ब-हाणपुर ते भादा रस्त्याच्या दरम्यान भादा गावानजीक दोन मोटारसायकलच्या धडकेत 42 वर्षीय इसमाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, दि. 16 सप्टेंबर रोजी भादा गावानजीक गणेश तुकाराम डावकरे रा ब-हाणपुर यांच्या बुलेट मोटार सायकल क्र MH-25 0202 ने धनराज मच्छिंद्र उबाळे वय 42 वर्ष राहणार भादा यांच्या मोटारसायकलला धडक दिल्यामुळे धनराज मच्छिंद्र उबाळे हा इसम जागीच ठार झाल्याने भादा गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. धनराज उबाळे यांना दोन मुले असून एम एच U 14 52 39 या मोटर सायकलला बुलेट ने धडक दिल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याच्या प्रेताचे शवविच्छेदन करून घटनेचा पंचनामा केल्यानंतर शुक्रवार दिनांक 17 सप्टेंबर 2021 रोजी दुपारी 2 च्या सुमारास भादा ता औसा येथे त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तर बुलेटवरील गणेश डावखरेला मार लागल्याने त्याच्यावर दवाखान्यात उपचार सुरू आसल्याचे समजते. या विचित्र आणि भयानक घटनेचा पुढील तपास भादा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश शिंदे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments