मोबाईल वर पिक पेरा नोंदणी करून घ्यावी
रमेश लांबोटे
निटूर: परिसरातील शेतकरी बांधवांनी मोबाईल वर पिक पेरा नोंदणी करून घ्यावी जेणेकरून आपला सातबारा पिक पेरा कोरा राहणार नाही सर्व निटूर परिसरातील शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी नोंदणी करून घ्यावी एका मोबाईल वर वीस शेतकऱ्यांची नोंदणी होते ज्यांच्याकडे मोबाईल नाही अशाने शेजारी मित्र परिवार यांच्याकडून नोंदणी करून घ्यावी हे काम सक्तीचे नसून अत्यंत गरजेचे आहे आवश्यक आहे जेणेकरून आपल्याला पुढील अडचणी येणार नाहीत तरी निटूर परिसरातील सर्व शेतकरी बांधवांनी मोबाईलवर पिक पेरा नोंदणी करून घ्यावी असे अवाहन सोशल मीडिया च्या मार्फत निटुर तलाठी सज्जाचे तलाठी- आर.बी. कुलकर्णी यांनी केले आहे.

0 Comments