Latest News

6/recent/ticker-posts

निलंगा येथे राष्ट्रवादी अल्पसंख्यांक मेळावा व पक्षप्रवेश सोहळा

निलंगा येथे राष्ट्रवादी अल्पसंख्यांक मेळावा व पक्षप्रवेश सोहळा

  



निलंगा:(प्रतिनिधी/रमेश लांबोटे) आज निलंगा शहरांमध्ये राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अल्पसंख्यांक मेळावा संपन्न झाला. याप्रसंगी अध्यक्षस्थानी अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष रशीदभाई शेख होते. तसेच प्रमुख पाहुणे म्हणुन आ. बाबासाहेब पाटील आणी युवक प्रदेश कार्याध्यक्ष सुरज चव्हाण हे होते. बैठकीमध्ये होऊ घातलेल्या जि.प.आणी पंचायत समीतीच्या निवडणुकांबद्दल मोर्चेबांधणी आणी अल्पसंख्यांक समाजाला प्रतिनीधीत्व याविषयी चर्चा झाली. अल्पसंख्यांकासाठी असलेल्या योजना आणी अंमलबजावणी यावर रशीद शेख यांनी मार्गदर्शन करुन योजनेला पुर्ण करण्यासाठी लागेल ती मदत करण्याचे आश्वासन दिले. यासोबतच राष्ट्रवादी कांग्रेस पक्षात समाजाच्या विवीध घटकातले महिला आणी पुरुष यांचा पक्षप्रवेश आ. बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. भविष्यात निलंगा तालुक्यात राष्ट्रवादी पक्ष भक्कम पक्ष म्हणुन उभा राहिल असा विश्वास या कार्यक्रमातुन दिसतोय हे नक्की. या कार्यक्रमासाठी माजी जि.प. अध्यक्ष पंडित धुमाळ, उल्हास सुर्यवंशी, लक्ष्मण कांबळे, महेश चव्हाण, लक्ष्मण बतले, ईस्माईल लदाफ, हसन चाऊस, फेरोज जागीरदार, फानफूलताई पाटील, महादेवी पाटील, सलीम पठाण सह पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments