श्रीधर सोनटक्के यांच्या सतर्कतेमुळे मोरांचे वाचले प्राण
डॉ.शिवानंद बिडवे यांच्या मार्गदर्शनुसार उपचार
चाकुर:( ता.प्र.सलीमभाई तांबोळी) चाकुर शहरात काल एका विहीरत पाणी पिण्यासाठी गेलेल्या मोरांचा तोल सुटला व विहिरीत पडला होता. श्रीधर सोनटक्के विहिरीतील पाणी सोडण्यासाठी गेले असता सदरील घटना त्यांच्या लक्षात आली. मोर पाण्यात पडलेले पाहुन त्यांनी तात्काळ विहिरीत उतरले व त्या मोरांला पाण्यातुन बाहेर काढले. पाण्यातुन मोर काढल्यानंतर श्रीधर सोनटक्के यांनी चाकुरचे तहसिलदार डॉ.शिवानंद बिडवे यांनी भ्रमणध्वनीव्दारे मोरांच्या बाबतीत माहिती दिली. शिवानंद बिडवे यांनी सांगितले की, आपण मोरांस घेऊन पशुवैद्यकिय दवाखान्यात घेऊन जाण्यास सांगितले व पशु दवाखान्यात फोन करुन मोरांवर प्राथमिक उपचार तात्काळ करण्याच्या सुचना केल्या. वनविभागाला दवाखान्यात येण्याच्या सुचना दिली. मोराच्या पायाला दुखापत झाल्यामुळे मोराला चलण्यासाठी अडचण होत होती. पशुवैद्यकीय दवाखान्यात गेल्यानंतर येथे मोरांवर प्राथमिक उपचार करण्यात आले. वनविभागांचे अधिकारी दवाखान्यात आले. असता मोराला त्यांच्या स्वाधीन करण्यात आले. चाकुर तालुक्याचे कार्यतत्तपर डॉ.शिवानंद बिडवे यांच्या मार्गदर्शनाखाली एका मुक्या प्राण्यांचे जीव वाचविण्यात आपल्याला यश आल्यामुळे आपल्याला समाधान वाटत असल्याचे श्रीधर सोनटक्के म्हणाले, योग्यवेळी सर्व यंञणामूळे मोरांचे जीव वाचले आहे. राञीच्या वेळात वनप्राणी पाण्याच्या शोधत भटकंत आहेत. वनविभागाने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. शेतात सध्या सोयबीनचे पिक असल्यामुळे वन्यप्राण्यांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकावे लागत आहेत. मोरा राञीच विहिरीत पडला होता. वन्यप्राण्यासाठी वनविभागाने पिण्याच्या पाण्यासाठी पाणवट्टे बनविण्यांची मागणी शेतकरी वर्गातुन होत आहे.

0 Comments