Latest News

6/recent/ticker-posts

कासार सिरसी येथे गणेशोत्सवानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरास उत्तम प्रतिसाद

कासार सिरसी येथे गणेशोत्सवानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरास उत्तम प्रतिसाद


कासार सिरसी:(प्रतिनिधी/फिरोज जागीरदार) कासार शिरसी येथील गांधी चौक गणेश मंडळाच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरास उत्तम प्रतिसाद लाभला या शिबिरात पुरुष व महिलांनी उत्तम प्रतिसाद देत रक्तदान केले यात एकूण पन्नास जणांनी रक्तदान केले. उमरगा येथील श्रीकृष्ण रक्तपेढी व गांधी चौक गणेश मंडळाच्या संयुक्त विद्यमाने येथील गांधी चौकात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाचे उद्घाटन शांतता कमिटीचे अध्यक्ष बडेसाब लकडहारे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष धनराज होळकुंदे, सरपंच दिपाली पांचाळ, ‌ग्रामपंचायत सदस्य वीरेश चिंचनसुरे, विवेक कोकणे यांचे सह गिरीश चिचनसुरे व मंडळाचे सर्व पदाधिकारी हजर होते. यावेळी रक्तदानाचे महत्त्व सांगताना ब्लड बँकेचे टेक्निशियन योगेश कांबळे म्हणाली की रक्तदानातून रक्तदात्यांच्या रक्तात असणाऱ्या गुप्त रोगाचे निदान होते. तर तुमच्या रक्तदानातून तीन गरजूचे प्राणही वाचू शकतात. असे ते म्हणाले यावेळी मंडळाच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला या शिबिरात धनराज होळकुंदे, मोनेश्वर पांचाळ, गिरीश चिंचनसुरे, विजय कुमार शिंगारे व जयश्री शिंगारे यांचेसह ग्राम विकास अधिकारी लोंढे यांनी रक्तदान केले. यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी येथील माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर भिमराव पाटील यांचेसह उमरगा येथील मारुती खमितकर, बाळू पवार व मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments