Latest News

6/recent/ticker-posts

रस्ता न बनवताच उचलली लाखो रुपयाचे बिले; बसपुर ग्रामस्थांची केली गटविकास अधिकाऱ्याकडे तक्रार

रस्ता न बनवताच उचलली लाखो रुपयाचे बिले; बसपुर ग्रामस्थांची केली गटविकास अधिकाऱ्याकडे तक्रार


रमेश लांबोटे

निलंगा: तालुक्यातील बसपुर येथे गावांतर्गततील सीमेंट काँक्रीटच्या रस्ता न करताच लाखो रुपयाचे बिले उचलण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. सविस्तर वृत्त असे की निलंगा तालुक्यातील बसपूर येथील केशव बिरादार यांच्या घरापासून ते अण्णाराव किशनराव बिराजदार यांच्या घरापर्यंत जन सुविधा योजने अंतर्गत रस्त्याची मंजुरी मिळाली होती. सदरील रस्ता न करताच त्या रस्त्याचे बिले उचलली असल्याचा खळबळजनक प्रकार येथे घडला आहे ही बाब ग्रामस्थांच्या लक्षात आल्यानंतर. संतापलेल्या ग्रामस्थांनी गट विकास अधिकारी निलंगा यांना निवेदन देऊन संबंधित रस्त्याची सखोल चौकशी करून जर याच्यामध्ये सरपंच उपसरपंच ग्रामसेवक कोणीही दोषी असल्यास त्यांना कडक शिक्षा द्यावी अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे. जन सुविधेच्या नावाखाली सिमेंट काँक्रीटचा रस्ता दाखवून लाखो रुपयांची बिले उचलून यांनी शासनाची ही दिशाभूल केली आहे. तरी संबंधित कंत्राटदार व ग्रामपंचायतच्या सरपंचावर चौकशी करून कारवाई करावी अशा मागणी स्वरूपाची निवेदन देण्यात आले आहे या निवेदनावर सिद्धेश्वर बिरादार, रामेश्वर क्षीरसागर, अण्णाराव मलीचे सहा ग्रामस्थांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.

Post a Comment

0 Comments