Latest News

6/recent/ticker-posts

अशोकराव पाटील निलंगेकर यांच्या हस्ते श्री.गणेशाची आरती

अशोकराव पाटील निलंगेकर यांच्या हस्ते श्री.गणेशाची आरती 


निलंगा:(प्रतिनिधी/रमेश लांबोटे) आज अशोकराव पाटील निलंगेकर(सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश काँंग्रेस कमिटी) यांनी पानचिंचोली ता. निलंगा येथील श्री गणेश मंडळ, शिवशक्ती गणेश मंडळ, लोकप्रिय गणेश मंडळ येथे श्री. गणेशाची महापुजा आणि आरती अशोकराव पाटील निलंगेकर हस्ते करण्यात आली. दिपक कांबळे यांनी यांच्या स्वगृही, होळीकर परिवाराच्या वतीने व स्वामी परिवाराच्या वतीने श्रीकृष्ण वस्त्र भांडार येथे सय्यद परिवाराच्या वतीने वस्त्र भांडार येथे, जाधव परिवाराच्यावतीने, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने काका जाधव बालाजी काळे व सर्व काँग्रेस प्रेमी या सर्वांकडुन जल्लोषात सत्कार करण्यात आले यावेळी निलंगा तालुका संगायो समिती चे सदस्य प्रा. सुरेंद्र धुमाळ, विक्रमजी पाटील, बालाजी पाटील, पंचाक्षरी स्वामी, सत्यप्रकाश होळीकर, पिरसाहेब सय्यद यासह अन्य काँंग्रेस प्रेमी निष्ठावंत कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments