Latest News

6/recent/ticker-posts

निलंगा तालुक्यातील धानोऱ्यात खंडित विद्युत पुरवठा सुरळीत

निलंगा तालुक्यातील धानोऱ्यात खंडित विद्युत पुरवठा सुरळीत



निलंगा:(विशेष प्रतिनिधी/इरफान शेख)निलंगा तालुक्यातील मौजे धानोरा गावात नळाला पाणी व 2 महिण्यापासून खंडीत असलेले विद्युत पुरवठा सुरळीत होत नव्हता म्हणून मराठी अस्मितेचा इशारा वृत्तपत्राने बातमी प्रसिध्द केली असता संबंधितांनी याची तात्काळ दखल घेत गावात विद्युत पुरवठा व पाणी व्यवस्थितरित्या चालू करण्यात आले आहे. गोविंद जाधव यांना संपर्क साधला असता ते म्हणाले गावात मागासवर्गीय वस्तीसाठी व राठी गल्ली साठी स्वतंत्र डी.पी. बसवण्यात आले आहे. तसेच गावात डेंगुचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून गावात DDT औषध गावातील दुर्गंधीच्या ठिकाणी टाकण्यात आले व गावातील प्रत्येक अडात TCL औषध टाकण्यात आले आहे अशी माहिती गोविंद जाधव यांनी दिली.

Post a Comment

0 Comments