नवतरुण गणेश मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिर
निलंगा:( प्रतिनिधी/रमेश लांबोटे ) तालुक्यातील मौजे डांगेवाडी येथे आज रक्तदान शिबिर आयोजन करण्यात आले होते. रक्तदान शिबिर नवतरुण गणेश मंडळाच्या वतीने ठेवण्यात आले होते गावातील तरुणाने व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान हेच जीवनदान !म्हणत यावेळी रक्तदान केले. या शिबिराला दत्ता मोहोळकर, अजिंक्य लोंढे व गावचे सरपंच प्रताप सुडे, गोविंद पाटील, विकास रुंजी, सुनील सोनटक्के व गणेश मंडळाचे अध्यक्ष सोपान लोहरे, नितीन डांगे, गणेश डांगे, राहुल डांगे, गोविंद सोनटक्के, गोपाळ सोनटक्के, विनोद बनसोडे यांची उपस्थिती होती. यावेळी एकूण वीस रक्तदात्यांनी रक्तदान करून शिबिर यशस्वीरित्या पार पाडले.

0 Comments