भादा येथे रक्तदान शिबिर संपन्न,81 रक्तदात्यांचे रक्तदान
बी जी शेख.
औसा: दि.19 तालुक्यातील मौजे भादा येथे आधार प्रतिष्ठान आणि अष्टविनायक गणेश मंडळ भादा यांच्या संयुक्त विद्यमाने रक्ताचा तुटवडा आणि गरज लक्षात घेता, घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरामध्ये एकूण 81 रक्तदात्यांनी रक्तदान केले, यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित भादा गावामध्ये सतत असे सामाजिक उपक्रम घेतले जातात मागील दोन वर्षापासून आधार प्रतिष्ठान आणि लाॅकडाऊन काळापासून सर्वांना मदत व्हावी म्हणून नवनवीन उपक्रम राबवले आहेत. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून गणपती महोत्सवात दि. 18 रोजी गणेश विसर्जनाच्या एक दिवस आधी रक्तदान घेण्यात आले. यात गावातील युवकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला व 81 रक्तदात्यांनी रक्तदान केले. या सामाजिक उपक्रमाचे जिल्ह्यात कौतुक होत आहे. सर्व रक्तदात्यांना प्रत्येकी एक वृक्ष देऊन त्यांच्याप्रती आभार व्यक्त करण्यात आले. सर्व रक्तदात्यांचे, आधार प्रतिष्ठानच्या सदस्यांचे, अष्टविनायक गणेश मंडळ सदस्यांचे तसेच प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत करणाऱ्या सर्व तरुणांचे, मार्गदर्शक व्यक्तींचे आधार प्रतिष्ठान यांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले. शिबीर यशस्वी साठी गणेश मंडळाचे पदाधिकारी व आधार प्रतिष्ठानचे सदस्य यांनी मोलाचे योगदान दिले.


0 Comments