Latest News

6/recent/ticker-posts

पालक मंत्री निटूर दौऱ्यावर येताच एसडीपीएल कंपनीने बुजवले सहा महिन्यापासून चे खड्डे

पालक मंत्री निटूर दौऱ्यावर येताच एसडीपीएल कंपनीने बुजवले सहा महिन्यापासून चे खड्डे



लातूर:( प्रतिनिधी/रमेश लांबोटे ) जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख हे मांजरा नदीला पूर आल्यामुळे निटुर, बसपुर,माचरटवाडी सह परिसरामध्ये अनेक ठिकाणी शेतकरयांचे सोयाबीन हे पाण्याखाली गेले आहे त्याची पाहणी करण्यासाठी आज पालक मंत्र्याचा दौरा निलंगा, पानचिंचोली, निटुर मार्गे येणार असल्याची माहिती मीळताच ; सकाळी ताबडतोप एसडीपीएल कंपनी मार्फत रेंगाळलेल्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली. परंतु यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. याचे कारण सुद्धा संताप व्यक्त होण्यासारखेच आहे.

निटुर(मोड) येथील मागील सहा महिन्यापासून रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले होते परंतु महामार्ग कंपनीने ते खड्डे बुजवले नव्हते. सर्वसामान्य नागरिकांना अनेक वाहतुकीच्या अडचणी निर्माण झाल्या होत्या वेळोवेळी प्रशासनाला निवेदनही दिले होते मात्र महामार्ग कंपनीने याकडे दुर्लक्ष केले परंतु पालकमंत्री येणार आहे ही माहिती कळताच महामार्ग कंपनीच्या वतीने आज खड्डे दुरुस्ती केली जात असल्याने पाहावयास मिळाले आहे.

Post a Comment

0 Comments