निलंगा तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदत जाहिर करा
राष्ट्रवादी कांग्रेस निलंगा चे उपविभागीय आधिकाऱ्यांना निवेदन
निलंगा:( प्रतिनिधी/रमेश लांबोटे ) आज राष्ट्रवादी कांग्रेस निलंगा यांच्यातर्फे उपविभागीय आधिकारी यांच्या प्रतिनिधीस निवेदन देण्यात आले. सदर निवेदनात तालुक्यात अतिवृष्टी झाली असुन अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला पिक अतिवृष्टीमुळे शंभर टक्के शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे. तरी शेतकऱ्यांना पेरणी फवारणी करण्यासाठी अति खर्च झालेला आहे. शासनाने ऑनलाइन-ऑफलाइनचा फेरा न लावता सरसकट शेतकर्यांना शासनाकडून हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. याप्रसंगी युवक तालुकाध्यक्ष उल्हास सुर्यवंशी, महेश चव्हाण, सलीम पठाण, रवी पाटील, ओम शिंदे, धम्मानंद काळे, अमर माने, महिला तालुकाध्यक्ष पानफुलताई पाटील आणी पदाधिकारी उपस्थित होते.

0 Comments