सेवानिवृत्त कर्मचारी अफसर शेख यांना त्वरित न्याय द्या अन्यथा तिव्र आंदोलन छेडू- मुजीब सौदागर
निलंगा:(विशेष प्रतिनिधी/इरफान शेख) निलंगा येथील शेख अफसर महताबसाब रा. निलंगा ता. निलंगा जि. लातूर येथील रहिवासी असुन ते कृषी उत्पन्न बाजार समिती औराद ( शा. ) ता.निलंगा येथे लिपीक पदावर सन १९७६ पासुन कार्यरत होते व ते साल सन २०१२ मध्ये सेवानिवृत्त झाले आहेत.तेव्हापासून सेवानिवृत्त होण्याच्या आधीची १४ महिण्याची पगार तसेच जी.पी.एफ. व ग्रजुव्हिटी आणि अर्जीत रजा यांची मिळणारी रक्कम त्यांना आजतागायत मिळालेली नाही ती त्वरित उपलब्ध करून द्या अथवा तीव्र आंदोलन छेडू अशा मागण्याचे निवेदन सहाय्यक निबंधक कार्यालय व उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे देण्यात आले आहे. निवेदनात पुढे म्हणटले आहे की सदरील विषयावर त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती, औराद ( शा, ) , जिल्हा निबंधक कार्यालय, लातूर उपविभागीय अधिकारी कार्यालय, निलंगा व सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, निलंगा या कार्यालयाकडे सन २०१२ पासुन वांरवार पत्रव्यवहार करुन सुध्दा त्यांना आजतागायत न्याय मिळालेला नाही व त्यांना जे काही रक्कम मिळणार आहे ती सुध्दा आजतागायत मिळालेली नाही. सदरील विषयाची माहिती मागणीसाठी गेले असता त्यांना उडवाउडवीची उत्तरे देऊन व त्यांना अपमानास्पद वागणुक देऊन हाकलुन देण्यात आले . तरी वरील संबंधित कार्यालयाने त्यांना आंधरात ठेऊन त्यांची दिशाभुल करीत आहेत. यामुळे संबंधिताला मानसिक त्रासामुळे कंटाळलेले आहेत त्यांना व त्यांच्य कुटुंबाला उदरनिर्वाह करण्याचे अवघड झालेले आहे, या मानसिक त्रासामुळे ते सर्व कुटुंबियासहीत आत्महत्या केल्याशिवाय त्यांच्याकडे काहीच पर्याय उरला नाही. त्यामुळे आपण आपल्या स्तरावरुन शेख अफसर महताबसाब यांना तात्काल सेवानिवृत्त होण्याच्या आधीची १४ महिण्याची पगार तसेच जी.पी.एफ. व ग्रजुव्हिटी आणि अर्जीत रजा यांची मिळणारी रक्कम मिळवुन द्यावी व सदरील शेख अफसर महताबसाब यांना १५ दिवसाच्या आत न्याय नाही मिळाल्यास येत्या ०२ आक्टोबर पासुन मा.उपविभागीय अधिकारी कार्यालय, निलंगा येथे बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल. तसेच सदरील शेख अफसर महताबसाब व त्यांच्या कुटुंबियास कांही बरे वाईट झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित प्रशासनाची राहील अशा मागणीचे निवेदन शेर- ए-हिंद शहीद टिपुसुल्तान संघटनेच्या वतीने येथील सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांना देण्यात आले आहे.सदरील निवेदनावर शहीद टिपू सुलतान संघटनेचे जिल्हाध्यक्ष मुजीब सौदागर, क्रांतिवीर लहुजी शक्ती सेना मराठवाडा कार्याध्यक्ष गोविंद सुर्यवंशी, गणराज्य संघ जिल्हाध्यक्ष रामलिंग पटसाळगे,युवा सेना जिल्हाउपाध्यक्ष अण्णासाहेब मिरगाळे,संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष प्रमोद कदम, रिपब्लिकन सेना तालुकाध्यक्ष सुनिल सूर्यवंशी, तालुका संघटक दिनेश शिंदे,अफसर शेख,हबीब शेख आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

0 Comments