Latest News

6/recent/ticker-posts

निलंगा कृषी कार्यालयाला आले यात्रेचे स्वरूप; कोरोना संसर्गाचे नियम धाब्यावर

निलंगा कृषी कार्यालयाला आले यात्रेचे स्वरूप; कोरोना संसर्गाचे नियम धाब्यावर



निलंगा:(विशेष प्रतिनिधी/इरफान शेख) अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील सोयाबीन, तूर, उडीद व मुग या पीकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून आॕफलाईन पध्दतीने विमा कंपनीकडे नुकसान भरपाई मिळावी म्हणून गुरूवारी ता. १६ रोजी तालुक्यातील शेतकऱ्यांनी येथील तालुका कृषी कार्यालयात मोठी गर्दी केली होती. या कार्यालयाला यात्रेचे स्वरूप आले होते. तर कार्यालयाकडे जाणारा रस्ता बंद झाला. या गर्दीने कोरोना संसर्गाचे सर्व नियम धाब्यावर बसविण्यात आले आहेत. विमा कंपनीच्या या प्रकाराबद्दल शेतकऱ्यांतून संताप व्यक्त केला जात आहे. यंदा दोन टप्यामध्ये पेरणी झाली असली तरी कांही मागील महीण्यात काळ पाऊस नसल्यामुळे पीके संकटात आली होती तर कांही पीके अतिवृष्टीमुळे गेली आहेत. याबाबत तालुक्यातील शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे नुकसान भरपाई मिळावी म्हणून आॕनलाईन तक्रार दाखल केली होती. मात्र आॕनलाईन तक्रार दाखल करण्यासाठी शेतकऱ्यांना अडचण येत असल्यामुळे शेतकऱ्यांचे सरसकट आॕफलाईन पंचनामे करा असे आदेश दिले होते. याबाबत विमा कंपनीकडून ज्या शेतकऱ्यांनी क्राॅप इन्सुरनस अॕपवर ऑनलाईन पद्धतीने तक्रार दाखल केली नाही अशा शेतकऱ्यांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याची गरज आहे. सप्टेंबर मध्ये झालेल्या पावसामुळे सोयाबीन, मुग, उडिद, ज्वारी पिकाचे नुकसान झाल्याचे विमा कंपनीस ऑफलाईन पध्दतीने पूर्वसूचना देण्याची गुरूवारी ता. १६ शेवटची तारीख आहे. यानंतर ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार नाहीत असे विमा कंपनी ने कळविले होते. त्यामुळे तालुक्यातील गावागावात हा मेसेज वाॕटसपवर, दवंडीद्वारे सांगण्यात आला यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. येथील तालुका कृषी कार्यालयात यात्रेचे स्वरूप आले होते. या कार्यालयाकडे जाणारा रस्ता शेतकऱ्यांच्या गर्दीने बंद झाला होता. शिवाय ग्रामीण भागातील आलेल्या शेतकऱ्यांच्या मोटारसायकल रस्त्याच्या बाजूला लावण्यात आल्याने वाहतुकीस मोठा खोळंबा झाला होता. यामुळे पोलिसांनी अनेक शेतकऱ्यांच्या गाड्याची हवा सोडल्याने अनेक शेतकऱ्यांना आपल्या गाड्या ओढत आणाव्या लागल्या. तर कोरोना संसर्गाचा काळ असतानाही सर्व नियम धाब्यावर बसवण्यात आले. कोरोना संसर्गाच्या नियमाचा फज्जा उडाल्याने विमा कंपनीवर कारवाई करावी अशी मागणी यावेळी कांही नागरिकांनी केली आहे. शिवाय एकच दिवस आॕफलाईन अर्ज स्विकारण्यात येणार असल्यामुळे मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी गर्दी केली होती.

Post a Comment

0 Comments