Latest News

6/recent/ticker-posts

गुळखेडा ता औसा येथे 'शेतकऱ्याची पोरं' संघटनेची स्थापना

गुळखेडा ता औसा येथे 'शेतकऱ्याची पोरं' संघटनेची स्थापना


बी डी उबाळे

औसा: तालुक्यातील गुळखेडा येथे "शेतकऱ्याची पोरं" संघटनेची स्थापना करण्यात आली. त्या निमित्तानेे गुळखेडा येथील हनुमान मंदिर चौकात बुधवार(दि.15सप्टेंबर )संघटनेच्या शाखेच्या फलकाचे अनावरण गुळखेड्यातील प्रतिष्ठित शेतकरी अरविंद भोसले , महावीर गिराम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थापक अध्यक्ष अजिंक्य शिंदे, गुळखेडा शाखा अध्यक्ष अमोल शिंदे, महावीर भोसले, सुधीर भोसले,सोपान भोसले, दिनकर बेले, शिवाजी चेंडके, सोमनाथ चिलबिले, गोविंद दाणे, बालाजी गिराम, दयानंद भोसले,शरद भोसले, दादा भोसले, गायकवाड ज्ञानेश्वर, शिवाजी भोसले, ज्ञानेश्वर भोसले, गोपाळ शिंदे,जीवन चिलबिले, युनूस शेख, श्रीमंत सुरवसे, पत्रकार पांचाळ विठ्ठल,,महेश कत्ते,उमेश भोसले, नितीन सुरवसे,संदीप बेले, विठ्ठल बेले,विक्रम शिंदे,विरसेन शिंदे सह गावातील असंख्य शेतकरी पुत्र उपस्थित होते. पीक विम्याच्या प्रश्नाबाबत विमा कंपनी विरोधात उभारलेल्या लढया मधून उदयास आलेल्या या संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मूलभूत प्रश्नांना वाचा फोडण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने बुधवार (ता.15) गुळखेडा(ता. औसा) येथे शाखा स्थापन करण्यात आली असून येणाऱ्या काळात औसा तालुक्यातील प्रत्येक गावोगावी या संघटनेच्या शाखा स्थापन असा विश्वास श्री शिंदे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पांचाळ विठ्ठल यांनी केले तर शाखाध्यक्ष म्हणून अमोल शिंदे यांनी प्रास्तावना करून आभार दिनकर बेले यांनी मांनले.

Post a Comment

0 Comments