Latest News

6/recent/ticker-posts

देवणी तालुक्यातील अचवला येथे covid-19 च्या नियमाचे पालन करत गणरायाला निरोप

देवणी तालुक्यातील अचवला येथे covid-19 च्या नियमाचे पालन करत गणरायाला निरोप


देवणी:(प्रतिनिधी/विक्रम गायकवाड) प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही मौजे अचवला येथे सार्वजनिक युवा गणेश मंडळाच्या वतीने श्रीगणेशाची स्थापना केली होती, covid-19 संक्रमनाचे नियम अनुसरून आणि शांततापूर्ण वातावरणात सुरक्षाविषयक सर्व प्रकारची काळजी, ध्वनी प्रदूषणविषयक सर्व कायदे काटेकोरपणे पाळून हा उत्सव साजरा केला. प्लॅस्टर ऑफ पॅरीसच्या मूर्ती, तसेच मोठय़ा आकाराच्या मूर्तींमुळे विसर्जनाच्यावेळी होणारे पाण्याचे प्रदूषण जैवविविधतेला गंभीर धोका निर्माण करणारे असते, त्यामुळे याचा गांभीर्याने विचार करुन मंडळाने यावर्षी मंदिरा मध्येच अत्यंत साध्या पद्धतीने व पर्यावरणपूरक(बायोडिग्रेडेबल) श्रीगणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली होती. येथे सात दिवसांचा गणपती असतो, त्याप्रमाणे दिनांक 16 सप्टेंबर 2021 रोजी विसर्जनाचा-निरोपाचा कार्यक्रम पार पडला तोही अत्यंत साध्या पद्धतीने व गर्दी न करता. ग्रामपंचायत सदस्य विष्णू बन यांच्या संकल्पनेनुसार मंडळाचे अध्यक्ष भीमराव जाधव व उपाध्यक्ष ओम बिराजदार यांनी विसर्जनाच्या महाप्रसादाचा कार्यक्रम गर्दी न होऊ देता कोवीड नियमांचे पालन करून घरोघरी स्वतः जाऊन प्रसादाचे वाटप केलेले आहे. यामुळे गणेशोत्सव काळात होणारा थर्माकोल आणि प्लॅस्टिकचा वापर टाळता आला. गणेशोत्सव यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष भिमराज जाधव, उपाध्यक्ष ओम बिरादारसह मंडळाचे सदस्य सचिन मोहिते, हर्षवर्धन मुरमे, अमोल पांचाळ, ओमप्रसाद सावळे, गगन कारभारी, शिवानंद बिराजदार, पांडुरंग बेद्रे, महादेव हल्लाळे, ज्ञानेश्वर बन, महादेव सावळे, तिरुपती बेद्रे, प्रदीप सूर्यवंशी, प्रदीप बिरादार यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments