नवोदय परीक्षेमध्ये नाविन्यपूर्ण यश प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार
निलंगा:(विशेष प्रतिनिधी/इरफान शेख) आज ग्रामपंचायत मदनसूरी येथे नवोदय परीक्षेमध्ये नाविन्यपूर्ण यश प्राप्त करून जवाहर नवोदय विद्यालयात निवड झालेल्या ओंकार माने, गणेश सगर, ऋतुजा माने, चैतन्य जाधव, सुमित सूर्यवंशी या विद्यार्थ्यांचा सत्कार शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजी माने यांच्या हस्ते करण्यात आले. गुणवंत विद्यार्थ्यांनी MPSC, UPSC अशा स्पर्धा परीक्षेत नाविन्यपूर्ण यश प्राप्त करून गावाचे नाव राज्य व देश पातळीवर लौकिक करावे अशी अपेक्षा जिल्हाप्रमुख शिवाजी माने यांनी सत्कार सोहळ्यात व्यक्त केली. विद्यार्थ्यांनी आई वडिलांचे कष्ट लक्षात घेऊन सातत्याने अभ्यास करणे गरजेचे आहे असे त्यांनी मत व्यक्त केले. तसेच सर्व विद्यार्थ्यांना व पालकांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी सरपंच अशोक जाधव यांनी केले. तसेच या कार्यक्रमासाठी उपस्थित ग्रामपंचायतचे सदस्य अशोक सूर्यवंशी, दिलीप जाधव, व्यंकट राजे, माधव शिंदे, गुलाब माने, धनराज माने, सुरेश चाफेकर, मधुकर जाधव, धोंडीराम जाधव व समस्त ग्रामस्थ उपस्थित होते.

0 Comments