Latest News

6/recent/ticker-posts

राबिया सैफी या पोलीस कर्मचारीचा बलात्कार करून निघृण हात्या केल्या प्रकरणी दोषींवर कारवाई करण्याचे दिले निवेदन

राबिया सैफी या पोलीस कर्मचारीचा बलात्कार करून निघृण हात्या केल्या प्रकरणी दोषींवर कारवाई करण्याचे दिले निवेदन



शेख बी जी 

औसा: दि.३ - दिल्ली पोलीस खात्यातील कर्मचारी रबिया सैफी यांच्यावर पाशवी बलात्कार करून तिचा निर्घृण खून करण्यात आला. ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी व निंदनीय आहे. पोलीस विभागातील महिला कर्मचारी अशा या घटनेचे बळी ठरत असेल तर इतर सर्वसामान्य महिला कशा सुरक्षित राहतील. ही घटना म्हणजे महिलांमध्ये दहशत निर्माण करणारी आहे. अशा घटनांनंतर महिला स्वतःला असुरक्षित समजतात. अशा या घटने नंतर देशाची प्रतिमा मलीन होत आहे. म्हणून राबिया सैफी यांच्यासोबत ज्यांनी हे कृत्य केले आहे त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. कठोर शिक्षा केल्यानंतर देशात अशा घटना पुन्हा घडणार नाहीत. म्हणून राबिया सैफी यांच्या गुन्हेगारांना ताबडतोब अटक करून कडक कार्यवाही करावी अशा आशयाचे निवेदन औसा तहसिलदारांमार्फत पंतप्रधान यांना देण्यात आले आहे. निवेदनावर समीयोदिन पटेल, जाधव, मुजफ्फर अली ईनामदार, शहनवाज पटेल, शेख शकील, शमा शेख, एडवोकेट फातेमा आलुरे, युनुस चौधरी,सौ.सुनिता सूर्यवंशी, adv. मजहर शेख, खुनमीर मुल्ला अदिंच्या स्वाक्षर्‍या आहेत.


Post a Comment

0 Comments