Latest News

6/recent/ticker-posts

अवैद्य दारू विक्री विरोधात भादा पोलीस ठाण्यावर महिला, दिव्यांगाचा धडकला मोर्चा

अवैद्य दारू विक्री विरोधात भादा पोलीस ठाण्यावर महिला, दिव्यांगाचा धडकला मोर्चा


बी डी उबाळे

औसा: भादा स्टेशन अंतर्गत असलेल्या 45 गावांमध्ये खुलेआम दारू विक्री होत असल्याने अनेकांचे संसार हे उध्वस्त होत आहेत यामुळे 45 औसा तालुक्यातील भादा पोलीस ठाणे अंतर्गत असलेल्या 45 गावांमध्ये खुलेआम दारू विक्री होत असल्याने अनेकांचे संसार हे उध्वस्त होत आहेत यामुळे गावातील महिला, दिव्यांग, युवक-युवतीचा मोर्चा धडकला. औसा तालुक्यातील भादा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रापासून शुक्रवार दि 3 सप्टेंबर 2021 रोजी मोर्चाला सुरुवात केली. या मोर्चात सहभागी असलेल्या महिलांनी अक्षरश: देशी दारूच्या बाटल्या व कोंबडी डोक्यावर टोपलीत मध्ये घेऊन भादा ठाण्यापर्यंत मोर्चा काढला. या मोर्चामध्ये महिला युवक-युवती यांचा आक्रोश आणि संताप पाहायला मिळाला. भादा ठाण्याच्या आवारातच मुख्य इमारती समोर अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे प्रदीप पाटील खंडापूरकर महिला सामाजिक कार्यकर्त्या सोनाली गुळबीले, माधुरी पाटील, राणी स्वामी, रामप्रसाद दत्त यांच्यासह 45 गावातील महिला-पुरुष युवक-युवती व दिव्यांग यांनी ठिय्या मांडला. दारू आणि कोंबड्यासह महिला व दिव्यांगाचा धडकला भादा ठाण्यावर मोर्चा यावेळी आंदोलनकर्त्या महिलांनी दारुमुळे कशा पद्धतीने कुटुंबाची राखरांगोळी होत आहे. अनेकांची झाली आहे याबाबत आक्रोश आणि संताप व्यक्त केला. काही बेवड्यांनी दारूच्या नादात शेती विकली तर महिला व मुलांना मारहाण हा नेहमीचा भाग आहे. पोलीस स्टेशन अंतर्गत 45 गावात अवैधपणे देशी-विदेशी दारूची खुलेआम विक्री होते. या अवैध दारू विक्रेत्यांना पोलिस प्रशासनाकडून हप्ते घेऊन संरक्षण दिला जात असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. लातूर जिल्ह्यात निखील पिंगळे यांनी पोलिस अधीक्षक पदांचा पदभार घेतल्यानंतर अवैद्य धंदे विरुद्ध मोठी मोहीम राबवत कारवाई सुद्धा केली. यामुळे अवैध धंदेवाल्याचे धाबे सुरुवातीला दणाणले पण भादा पोलीस स्टेशनच्या हद्दीत दारू, गुटका, मटका, गांजा यांचे मोठ्या प्रमाणात विक्री होते. वर्षाकाठी सरासरी भादा पोलीस ठाण्याअंतर्गत 50 लोकांचा यात जीव जातो, त्यावर अवलंबून असणारे 250 व्यक्ती यांचे देखील जीवन उद्ध्वस्त होते. यामुळे या ठाण्याच्या हद्दीत असलेले बीट अंमलदार गिरी आणि डोलारे यांची तात्काळ बदली करण्यात यावी व एक महिन्याच्या आत सर्व अवैध धंदे बंद करावेत अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलनाचा छेडण्याचा इशारा दिला आहे.

Post a Comment

0 Comments