राबिया सैफीम बलात्कार व हत्या प्रकरणी गुन्हेगारांना फाशीची शिक्षा द्या
निलंगा:(विशेष प्रतिनिधी/इरफान शेख) दिल्ली येथील 21 वर्षीय पोलीस महिला कर्मचारी राबिया सैफी या महिला कर्मचाऱ्यांची अमानुषपणे बलात्कार करुन हत्या करणाऱ्या नराधमास फाशीची शिक्षा द्यावी अश्या मागण्याचे निवेदन निलंगा उपविभागीय अधिकारी कार्यालय मार्फत देशाचे पंतप्रधान नरेंद मोदीं यांना समस्त निलंगेकरातर्फे देण्यात आले. निवेदनात म्हंटले आहे की समस्त निलंगेकरा तर्फे निवेदन देऊन मागणी करण्यात येते की 21 वर्षीय राबिया सैफी महिला पोलीस कर्मचारी भगीनीच अपहरण व बलात्कार करुन अमानुषपणे तब्बल 50 ठिकाणी चाकुने वार करुन निर्दयीपणे हत्या करण्याची घटना दिल्ली येथे घडली असून सदरील घटनेचा आम्ही समस्त निलंगेकर जाहीर निषेध करतो, सदरील घटना मानुसकीला काळीमा फासणारी असुन या घटनेत चार आरोपी सह 1 महिलाही सहभागी असल्याचे उघडीस आले असुन सर्व आरोपी अद्याप मोक्काट आहेत. तरी सदरील आरोपीना त्वरीत अटक करुन फाशीची शिक्षा देण्यात यावी व राबिया सैफी या भगिनीच्या घरच्यांना नुकसान भरपाई व शासकीय नौकरीत समाविष्ठ करुन घेण्यात यावे अश्या मागण्याचे निवेदन देण्यात आले. निवेदनावर मुजीब सौदागर, प्रा दयानंद चोपणे, गोविंद सूर्यवंशी, मुस्तफा शेख, सब्दर कादरी, जाकीर शेख, बाबा बिबराले, अमोल सोनकांबळे, शारुख सय्यद, महेबूब शेख, शौकत शेख, सोहेल खादीम, अझहर हाश्मी, उमर फारुख,जाधव परमेश्वर, इस्माईल खुरेशी,फैमान कादरी, अली मणियार, हुसेन चौधरी, अरबाज शेख, नईम खतीब, अझहर पटेल, सुनील सूर्यवंशी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

0 Comments