ज्येष्ठ पत्रकार संजय जेवरीकर यांच्या लेखणीतून...
आम्ही हुबेहूब आपल्यात 'साहेब' पाहतोय...
काल महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित विलासराव देशमुख यांची मंत्रालयात भेट घेतली.. कोरोना सुरू झाल्यापासून सातत्याने महाराष्ट्राच्या सेवेत काम करणारा हा तरुण मंत्री संपूर्ण महाराष्ट्राच्या तरुणाचे आशास्थान आहे.. झपाटल्यासारखे कोरोनाच्या काळात काम करणाऱ्या या मंत्र्याची कामाची तडफ स्व.विलासराव देशमुख यांच्यासारखीच आहे.. जे काम होतेय ते व्हायलाच पाहिजे आणि जे होत नाही ते स्पष्टपणे समोरच्याला सांगायला हवे हा असे सातत्याने ते आपल्या खाजगी सचिवांना सांगत होते.. येणाऱ्या प्रत्येकाला वेळ देवून त्यांची वैयक्तिक विचारपूस करताना अनेक जुन्या कार्यकर्त्यांना विलासराव यांची उणीव न भासू देण्याचे काम ते सातत्याने करताना दिसत आहेत..सतत कार्यकर्त्यांचा राबता, अधिकाऱ्यांच्या बैठका, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, वैद्यकीय आणि सांस्कृतिक विभागाशी सततचा संपर्क, डॉक्टर्स, नर्सेस यांच्या प्रश्नांची सातत्याने दखल घेत कामात व्यग्र असलेला हा तरुण नेता नक्कीच महाराष्ट्राचे आशास्थान आहे.. महाविकास आघाडीतील प्रत्येक घटकांची काळजी घेत त्यांचीही कामे झाली पाहिजेत असा सातत्याने प्रयत्न करताना पाहिले की त्यांच्यातला विलासरावजी फॅक्टर चटकन दिसून येतो.. पक्ष संघटन मजबुत करण्यासाठीची आखणी सातत्याने करताना ते दिसून येत आहेत.. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पक्ष बांधणी करताना तरुणांना कशी संधी देता येईल याचा सातत्याने ते प्रयत्न करत आहेत.. एक अधिकारी बदलीसाठी चकरा मारत होते, काल त्यांनी भेट घेतली, नागपूरहून त्यांना मुंबईत यायचे होते, त्यांच्या छोट्या मुलीचा काहीतरी प्रॉब्लेम असल्याने त्यांना बदली गरजेची होती, ते 8 वर्षांपासून बाहेर काम करत होते.. जागा रिकामी असतानाही त्यांना अडथळे येत होते.. त्यांनी अमित देशमुख यांची भेट घेतली आणि क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी आदेश देऊन टाकले..इतके जेन्युयन करण असेल तर का बदली थांबली यावर ते चिडले आणि हे काम होणे त्यांचा अधिकार आहे हे दाखवून देत, अधिकाऱ्यांविषयी असलेली तळमळही दाखवून दिली.. मी गतकाळातल्या विलासरावजी देशमुख यांच्या काळात गेलो.. असाच एक किस्सा माझ्याच बाबतीत घडला होता, मी मामाच्या बदलीसाठी लातुरात विलासराव साहेबाना भेटलो होतो..काम झाले नाही म्हणून मुंबईत भेटायला आलो.. त्यांनी विचारले अजून काम झाले नाही का ? मी म्हटले नाही साहेब.. तात्काळ सचिवांना बोलावून घेण्यात आले, कामही वैद्यकीय खात्यातीलच होते.. बदली खूप छोटी होती मात्र साहेबानी ती सचिवांकडे सोपवली.. सचिव म्हणाले इतक्या छोट्या कामाला तुम्ही मंत्री महोदयाकडे कशाला गेलात,मी म्हटले साहेब यातले मला काहीच माहीत नाही आपण मार्गदर्शन करावे.. सचिवांनी तात्काळ पुणे ऑफिसला फोन लावला आणि ही बदली विलासराव साहेबांची खास बदली आहे व्हायला हवी.. योगायोग असा झाला तेव्हा फॅक्सचा वापर खूप होता,फॅक्सने बदलीची ऑर्डर लातूरला आम्ही जाण्याच्या अगोदर पोचली सुद्धा.. मामाला नंतर तिथल्या सिव्हिल सर्जनचा त्रास झाला मात्र साहेबांची कामाची ही पद्धत होती, जे होत नाही ते करायचे कसब त्यांच्यात होते..मी जवळपास अर्धा तास अमित देशमुख यांच्या कार्यालयात बसून होतो.. माझे निरीक्षण सुरूच होते.. मी अमित देशमुख यांच्यात साहेबाना पाहत होतो..काम करण्यासाठीची नजर, जे होते ते झालेच पाहीजेचा आग्रह आणि होत नाही ते स्पष्ट सांगण्याची धमक असलेला हा नेता लवकरच मंत्रालयाचे एक एक मजले चढत वर जावो हीच समस्त विलासराव देशमुख समर्थकांची इच्छा आहे.. एक तरुण,चाणाक्ष,हुशार आणि आपल्या खात्याला न्याय देणारा हा नेता विलासराव साहेबांचे सगळे गुण घेऊन नक्कीच महाराष्ट्राच्या राजकारणात प्रत्येकाला न्याय देणारा नक्कीच ठरेल.. साहेब निवडणुकीपूरते एक वर्ष पक्षीय राजकारण करायचे आणि बाकी चार वर्षात विरोधकांच्या सुद्धा कामाला न्याय देऊन त्यांना आपलेसे करायचे.. अमित देशमुख यांनीही हीच त्रिसूत्री समोर ठेवून एक आदर्श राजकारणाचा पायंडा महाराष्ट्रात घालावा हीच सदिच्छा.. आम्ही हुबेहूब आपल्यात साहेबाना पहातोय, त्यामुळे आमच्या मनाला ठेस पोचणार नाही हीच अपेक्षा.
संजय जेवरीकर(ज्येष्ठ पत्रकार)


0 Comments