कासार सिरसी येथे भारत बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद
कासार सिरसी:(प्रतिनिधी/फिरोज जागीरदार) येथे समस्त शेतकरी व महा विकास आघाडी पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या तर्फे भारत बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.केंद्र सरकार शेतकऱ्या विषयीच्या चुकीच्या धोरणामुळे आज सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मागच्या महिन्यात ११००० हजार भाव असलेले आज शेतकऱ्यांना सोयाबीन कवडी मोल भावाने विक्री करण्याची वेळ केंद्रातील भाजप सरकार आणली आहे.याविरुद्ध पुकारण्यात आलेल्या भारत बंद आंदोलनात रोजी कासार शिरशी येथील शेतकरी बांधव व महाविकास आघाडी च्या वतीने भारत बंद आवाहनाला प्रतिसाद देत संपूर्ण गाव बंद करून शेतकरी बांधव यांना पाठिंबा देण्यात आला. सोयाबिनला १२००० ते १५००० भाव देण्यात यावा अशी मागणी शेतकऱ्या कढुन होत आहे. कासार शिरशी पोलिस स्टेशनचे सपोनि रेवनाथ डमाळे व तलाठी सूर्यवंशी यांना निवेदन देण्यात आले, यावेळी सचिन दादा कडतने, गिरीश चिंचनसुरे, राहुल चिंचनसुरे, मोनेश्वर पांचाळ, सुमित देवसाळे जगन जगदाळे, लाला मुजावर, ईस्माइल मुजावर, राम बरकंबे, नेमचंद विजापुरे, जिंदा मुजावर, व्यंकट जानकर, शरणाप्पा चिंचनसुरे, रब्बानी मोरखंडे, संदीप डांगे, गुलाब पल्लव आदि शेतकरी उपस्थित होते.


0 Comments