Latest News

6/recent/ticker-posts

निटूर पोलिसांनी केली अवैद्य दारू विक्रेत्यावर कारवाई 2640 रुपयांचा मुद्देमाल जप्त

निटूर पोलिसांनी केली अवैद्य दारू विक्रेत्यावर कारवाई 2640 रुपयांचा मुद्देमाल जप्त


निटूर:( प्रतिनिधी/रमेश लांबोटे ) निलंगा तालुक्यातील निटूर व कलांडी येथे होत असलेल्या अवैध धंद्यावर आज निटुर पोलिसांच्या वतीने छापा टाकून अवैध देशी दारूचा साठा जप्त करण्यात आला आहे. निटुर पोलिस चौकीचे बीट अंमलदार सत्यवान कांबळे, पोलीस कॉन्स्टेबल हरी काबळवाड, शिवानंद गीरबोणे यांच्या पथकाने निटुर व कलांडी येथे अचानक छापा टाकून देशी दारू सिमला संत्रा कंपनीच्या 44 बॉटल किंमत दोन हजार सहाशे चाळीस रुपये असा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपी शंकर साधू साळुंखे, मिनाबाई अशोक कटाळे दोघेही राहणार निटूर व अंकुश शंकर वाघमारे राहणार कलांडी यांच्यावर निटूर पोलीस चौकी मध्ये दारूबंदी कायदा कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास बीट अंमलदार सत्यवान कांबळे करत आहेत.

Post a Comment

0 Comments