निलंगा शहरात ईद-ए-मिलादुन्ननबी निमित्त अवघ्या 6 तासात 111 रक्तदात्यांनी केले रक्तदान
निलंगा:(विशेष प्रतिनिधी/इरफान शेख ) आज मंगळवारी निलंगा शहरात ईद-ए-मिलादुन्ननबी निमित्त भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी 9:00 ते दुपारी 3:00 पर्यंत अवघ्या 6 तासात 111 रक्तदात्यांनी रक्तदान केले. कोरोनाच्या महामारीत अनेकांच्या नातेवाईक मित्र मंडळी जग सोडून गेल्याने राज्य सरकारने अनेक धार्मिक राजकीय रॅली कार्यक्रमास तात्पुरती बंदी घालुन शासनाला रक्तदान शिबीराचे आयोजन करण्याचे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली होती. त्याच धर्तीवर निलंग्याचे तहसीलदार गणेश जाधव यांनी अनावश्यक खर्च टाळून देशासाठी राज्यसाठी रक्तदान शिबीराचे जास्तीत जास्त आयोजन करावं अशी विनंती केल्याने त्यास गेल्या ५ महिन्यापासून निलंगा शहरांत शिबिराचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्याच अनुषंगाने मुस्लिम बांधवांच्या प्रति वर्षा प्रमाणे याही वर्षी निलंगा येथे हजरत मुहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त शहरांत भव्य दिव्य रॅली, ढोल, ताशे अश्या अनावश्यक खर्च टाळून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरास युवकांनी मोठा प्रतिसाद देत अवघ्या सहा तासात 111 रक्तदात्यांनी रक्तदान करून शिबिरात सहभाग नोंदवले आहे. या रक्तदान शिबीराचे उद्घाटन ईद-ए-मिलादुन्ननबी कमिटीचे अध्यक्ष सय्यद युसूफ जानी कादरी, निलंगा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक बाळकृष्ण शेजाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक गोविंद राठोड, बाळासाहेब नागमोडे, माजी नगराध्यक्ष हमीद शेख, कांग्रेस अल्पसंख्याकचे निलंगा विधानसभा अध्यक्ष असगर अन्सारी, नसीम खतीब यांच्या हस्ते रिबीन कापवून करण्यात आले. तसेच यावेळी टिपूसुलतान संघटनेचे तालुका अध्यक्ष सबदर कादरी, मराठा सेवा संघाचे जिल्हा संघटक विनोद सोनवणे, माधव गाडीवान, नवाडे ,खलील तिलगुरे, इम्रान सय्यद, जुबेर खतीब, जाबेर खान इत्यादी यावेळी असंख्य समाज बांधवांनी आपलं रतकदात्यास रक्तदान करण्याची विनंती करत सकाळी 9:00 ते दुपारी 3:00 अवघ्या 6 तासात एकूण 111 रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे जगाचे धर्मगुरू प्रेषित मुहम्मद पैगंबर यांची जे शिकवण आहे की ज्या मातीत तुम्ही जन्मायला आलात त्या मातीचे मनातून सर्व समाजासाठी समाजसेवा मदत करणे आवश्यक आहे ह्याच आदेशाचे पालन गेल्या 15 वर्षांपासून निलंगा शहरांतील मुस्लिम समाज करत आहे. निलंगा शहर हे महाराष्ट्रात रक्तदात्यांचा केंद्र म्हणून नाव रुपाला आले आहे या शिबिरासाठी सर्व समाजातील बांधवांनी परिश्रम घेतले आहे.
0 Comments