मुदगड एकोजी मध्ये दोन तरुणांचा शेततळ्यात पडून मृत्यू
मदनसुरी:(प्रतिनिधी/द्रोणाचार्य कोळी) निलंगा तालुक्यातील मुदगड एकोजी येथील दोन तरुण शेतातील तणनाशक फवारणी करण्यासाठी पाणी आणण्यासाठी शेततळ्यात गेले असता पाय घसरून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, निलंगा तालुक्यातील मुदगड एकोजी गावातील भैरव तोरंबे, वय वर्षे 25 शेतातील तणनाशक फवारणी करण्यासाठी शेतातील शेततळ्यात पाणी आणायला गेले असता अचानक पाय घसरून पडलें असताना, त्याला पोहता येत नसल्याचे पाहून त्याला वाचवण्यासाठी रणजित इंगळे वय वर्षे 40 यांनी पाण्यात उडी मारली पण दोघांचाही पाण्यात बुडून दुर्दैवी अंत झाल्याची घटना घडली आहे. यामुळे परिसरात शोककळा पसरली आहे.पुढील तपास कासार सिरसी पोलीस अंतर्गत करण्यात येत आहे.
0 Comments