रामायण रचनाकार महर्षी वाल्मिक ऋषींची विचारधारा कोळी बांधवांनी स्वीकारावी-पत्रकार द्रोणाचार्य कोळी
निलंगा:(प्रतिनिधी/रमेश लांबोटे) रामायण रचनाकार महर्षी वाल्मिक ऋषींचे विचार जीवनात उतरवण्याचा प्रामाणिक प्रयत्न घराघरातील प्रत्येक व्यक्तींनी केला तर समाजात प्रभू रामचंद्रासारखे, लक्ष्मनासारखे आदर्श व्यक्तिमत्व निर्माण होतील. आदर्श कुटूंब पद्धती,ध्येयवादी, एकवचनी सुत्रधारेप्रमाणे जीवन जगण्याचा मार्ग रामायण रचनाकारांनी रामायणाच्या माध्यमातून सांगितलेली आहे. बदलत्या काळानुसार कोळी समाज बांधवांनी जीवनशैली स्विकारली पाहिजे. कोळी समाजातील अनेक बांधवाना शासनाच्या सुविधा मिळत नाहीत, घटनाकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, राजश्री शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या कोळी समाजातील व्यक्ती व्यक्तीना न्याय दिलेला आहे. कोळी समाजातील अनेक व्यक्तींचे राष्ट्रांच्या जडणघडणीत मोठे योगदान आहे. सतत समाजाच्या सेवेत असणारा कोळी बांधव आज विकासाच्या बाबतीत खूप दूर आहे. त्यांनी एकत्र येण्याची आज काळाची गरज आहे. समाजाततील सदन व्यक्तींनी समाजपयोगी कार्य करून समाजासाठी आपले योगदान सार्थ करून महर्षी वाल्मिक ऋषींची विचारधारा अंगिकारली पाहीजे असे मत पत्रकार द्रोणाचार्य कोळी यांनी निलंगा तालुक्यातील कोकळगाव येथे महर्षी वाल्मिकी जयंतीनिमित्त आपले विचार मांडले. यावेळी माजी सरपंच दत्ता मेहकरे, माजी सरपंच अनिल कामले, माजी सरपंच किरण उजने, ह.भ.प.मल्हारी सगर महाराज, पप्पू बेदरे, लातूर जिल्हा वडार समाजाचे मार्गदर्शक वसंतराव मंजुळे, वाल्मिक कोळी, दत्तात्रय विठुबोने, शिवदर्शन लामतुरे, गुलचंद वागन्ना, हरी विठुबोने, विवेकानंद विठुबोने, दयानंद विठुबोने, प्रणव कोळी,आदींची उपस्थिती होती. प्रथमतः मान्यवरांच्या हस्ते महर्षी वाल्मिक ऋषींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. महाराष्ट्र वडार समाजाचे कार्याध्यक्ष वसंतराव मंजुळे यांनी कोळी बांधवविषयी मनोगत व्यक्त केले.
0 Comments