भादा जिल्हा परिषद शाळेत गुणवंत विद्यार्थ्यांचा,पालकांचा सत्कार
बी जी शेख
औसा: तालुक्यातील भादा येथील जिल्हा परिषद प्रशाला आणि जिल्हा परिषद कन्या प्रशाला या दोन्ही शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा नुकताच शाळेमध्ये सत्कार करण्यात आला. सन 2020 - 21या शैक्षणिक वर्षात दहावी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि गुंणवंतांच्या पालकांचा बुधवार दि 20 ऑक्टोबर 2021 रोजी सत्कार करण्यात आला. यामध्ये कन्या प्रशाला भादा मधील प्रथम आलेली निकिता कात्रे, द्वितीय-आदिती उमाकांत भादेकर, त्रितीय-आलिशा पठाण तर जिल्हा प्रशाला मुलांची मध्ये प्रथम-विश्वजित चंद्रकांत भादेकर, द्वितीय-आवेश बालाजी उबाळे, त्तृतीय- सोमेश्वर क्षीरसागर आणि ओमकार पाटील तर 15 ऑगस्ट 2021 रोजी ऑनलाईन स्पर्धा शालेय स्तरावर विविध स्पर्धा व मुलां-मुलींना बक्षीस वितरण प्रेरणा देण्यासाठी, प्लास्टिक मुक्ति अभियान अंतर्गत मुलीची राज्यस्तरीयसाठी निवड झाल्यामुळे शालेय स्तरावर सत्कार करण्यात आला. बाला उपक्रम अंतर्गत रंगरंगोटी प. स. सदस्य शिवप्रसाद शिंदे यांचा शाळेत सत्कार स्वच्छ वर्ग,सुंदर वर्ग शालेय स्तरावर शिक्षकांचा सत्कार करण्यात आला यामध्ये,श्रीमती मंठाळे साधना, तोटे सुधीर, श्रीमती शेंडे तर विविध उपक्रमात सहभागी शिक्षकांचा सत्कार करण्यात आला यामध्ये श्रीमती खडके अनिता,डॉ पाटील नागेश, जगताप किशोर तसेच बाला उपक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी लोकसहभागातून लोकवाटा गोळा करण्यासाठी गावातील बाहेरगावी असलेले कर्मचारी, पालक, नागरिक, माजी विद्यार्थी यांचे सहकार्य मिळण्यासाठी सर्वांच्या सहकार्याने प्रयत्न सुरू असून शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अर्जुन लटूरे यांनी 1हजार 100 रु लोकवाटा भरून पावती घेऊन या उपक्रमास प्रारंभ केला आणि तोटे सर यांनीही रु 1 हजार रु ची पावती घेतली. शाळा विकासासाठी लोकसहभागातून लोकवाटा मिळविण्यासाठी सर्वांचे सहकार्य महत्त्वाचे आहे असे आवाहन शाळेतर्फे करण्यात आले आहे. तर या कार्यक्रमातील मुख्य असे गुणवंत विद्यार्थ्यां पैकी आदिती उमाकांत भादेकर या विद्यार्थिनीने आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी उपस्थित प. स. सदस्य शिवप्रसाद शिंदे, गावच्या इतिहासातील पहिल्या महिला सरपंच मीनाबाई दरेकर, शा.व्य. समितीचे अध्यक्ष अर्जुन लटूरे, सदस्य पांडुरंग कात्रे, शशिकांत घोडके, तंटा मुक्ती अध्यक्ष सूर्यकांत पाटील, पत्रकार व पालक बी डी उबाळे तसेच गुणवंत विद्यार्थी व पालक, शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्रीमती खडके यानी केले तर कार्यक्रमाचे आभार डॉ नागेश पाटील यांनी व्यक्त केले.
0 Comments