Latest News

6/recent/ticker-posts

निटूर परिसरात छुप्या मार्गाने अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले

निटूर परिसरात छुप्या मार्गाने अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले 


निलंगा:( प्रतिनिधी/रमेश लांबोटे ) तालुक्यातील निटुर येथील शिरूर आनंतपाळ पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या निटूर् पोलिस चौकीचे बीट अंमलदार सत्यवान कांबळे यांनी मागील अनेक दिवसांपासून अवैध रित्या दारू विक्री करणाऱ्या विक्रेत्यावर धाडी टाकून कारवाया करण्याचे सत्र सुरू केले आहे. यामुळे छुप्या मार्गाने अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. शिरूर आनंतपाळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुडके व कदम  यांच्या मार्गदर्शनाखाली आज बुधवारी दुपारी 12 वाजता निटुर पोलीस चौकीचे बीट अंमलदार सत्यवान कांबळे साहेब ,पोलीस कॉन्स्टेबल हरी कांबळवाड पोलीस कॉन्स्टेबल शिवानंद गिरबोने यांच्या पथकाने निटुर येथे छापा टाकून 720 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यात देशी दारू सिमला संत्रा कंपनीच्या 12 बॉटल मिळाले आहेत. यामध्ये आरोपी राहुल तुळशीराम मधाळे वय 38 याला महाराष्ट्र दारूबंदी कायदा अंतर्गत गुन्हे दाखल करून पुढील तपास बीट अंमलदार सत्यवान कांबळे हे करीत आहेत. मागील काही दिवसापासून निटूर पोलिसांचा अवैध रित्या व्यवसाय करणाऱ्या व्यवसायिकावर छुप्या पद्धतीने छापे टाकून धाडसत्र सुरू आहे यांच्या कार्यामुळे निटूर परिसरात पोलिसांचा दरारा वाढला असून नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments