महाराष्ट्र महाविद्यालयातील प्रसाद बोरुळे चे जेईई अडव्हान्स्ड परीक्षेत यश
निलंगा:( विशेष प्रतिनिधि/ इरफान शेख ) देशातील नामांकित आयआयटी आणि एनआयटी या शैक्षणिक संस्थामध्ये प्रवेश घेण्यासाठी जेईई अडव्हान्स्ड्-२०२१ चा परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झालेला असून महाराष्ट्र महाविद्यालयातील प्रसाद बालाजी बोरुळे या विद्यार्थ्याने यश मिळवून आयआयटी आणि एनआयटी शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश घेण्यासाठी पात्र ठरला आहे. प्रसाद बोरुळे या विद्यार्थ्याने ग्रामीण भागातील महाराष्ट्र महाविद्यालयात शिक्षण घेऊन हे उज्वल यश संपादन केले आहे. विद्यार्थ्यांच्या या घवघवीत यशाबद्दल महाराष्ट्र शिक्षण समितीचे अध्यक्ष विजय शिवाजीराव पाटील, संस्थेचे सचिव बब्रुवान सरतापे, संस्थेचे समन्वयक दिलीपराव धुमाळ, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव कोलपुके, उपप्राचार्य डॉ. चंद्रकुमार कदम, उपप्राचार्य प्रशांत गायकवाड, विज्ञान विभागाचे समन्वयक राजेंद्र कटके, सी.ई.टी. सेलचे समन्वयक श्रीराम पौळकर, अनुप पांचाळ, राकेश दवणे, विजय देशमुख आदीनी अभिनंदन केले आहे.
0 Comments