Latest News

6/recent/ticker-posts

फिल्मफेअर पुरस्कार विजेते कला दिग्दर्शक लीलाधर सावंत यांचे दुःखद निधन

फिल्मफेअर पुरस्कार विजेते कला दिग्दर्शक लीलाधर सावंत यांचे दुःखद निधन


वाशिम: प्रसिद्ध बॉलिवूड कला दिग्दर्शक लीलाधर सावंत यांचं निधन. गेल्या कित्येक दिवसांपासून दीर्घ आजाराने लीलाधर सावंत त्रस्त होते. अखेर वाशिम येथील एका खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पावणे दोनशे हिंदी चित्रपटांचं कला दिग्दर्शन करणारे लीलाधर सावंत हे काही वर्षांपूर्वीच चंदेरी दुनियेला रामराम करत वाशिम जिल्ह्यातील जऊळका येथे स्थायिक झाले होते. लीलाधर सावंत यांच्या दोन बायपास शस्त्रक्रिया झाल्या होत्या. इतकंच नाही तर त्यांना दोनदा ब्रेन हेमरेज अटॅकही आले होते. सोबतच त्यांची जीभ देखील निकामी झाली होती. या आजारपणामध्ये त्यांची सगळी जमापुंजी खर्च झाली होती. त्यामुळेच एका मुलाखतीत त्यांची पत्नी पुष्पा सावंत यांनी लीलाधर सावंत यांच्या सहकाऱ्यांना आर्थिक मदतीचं आवाहन केलं होतं. लीलाधर सावंत यांनी तब्बल २५ वर्ष कलाविश्वात कला दिग्दर्शक म्हणून काम केलं होतं. मात्र, १० वर्षांपूर्वीच त्यांनी हे क्षेत्र सोडून वाशिममधील जऊळका येथे वास्तव्यास आले होते. कला दिग्दर्शक लीलाधर सावंत यांनी 'सागर', 'हत्या', '100 डेज', 'दिवाना', 'हद कर दी आपने', 'सलाखें', ' क्रांतिवीर', ' शहंशाह', ' मै खिलाडी तु आनाडी', 'अनाडी', अशा एकूण 177 चित्रपटांना कला दिग्दर्शन केले होते. त्यांना फिल्मफेअर पुरस्कार, दादा साहेब फिल्म फाउंडेशन अवार्ड, माणिकचंद पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. लीलाधर सावंत अनेक चित्रपटांसाठी उत्तम सेट बनवायचे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी,जावई असा परिवार आहे. "मराठी अस्मितेचा इशारा" परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.


Post a Comment

0 Comments