Latest News

6/recent/ticker-posts

निलंगा राष्ट्रवादी काँग्रेस तर्फ इंधन दरवाढीमुळे मोदी सरकारचा निषेध

निलंगा राष्ट्रवादी काँग्रेस तर्फ इंधन दरवाढीमुळे मोदी सरकारचा निषेध


निलंगा:(प्रतिनिधी/रमेश लांबोटे) बुधवारी राष्ट्रवादी कांग्रेस निलंगा मार्फत इंधन दरवाढीमुळे मोदी सरकारचा निषेध करण्यात आला. पेट्रोल, डिझेलच्या दरात रोजरोजच्या होणाऱ्या दरवाढीमुळे हैराण झालेल्या सर्वसामान्य नागरिकांतर्फे मोदी सरकारचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी कांग्रेस निलंगा यांच्या वतीने शिवाजी चौक ते उपविभागीय अधिकारी कार्यालय पर्यंत मोटारसायकल ढकलुन उपविभागीय आधिकारी यांच्या मार्फत निवेदन देऊन केंद्र सरकारच्या इंधन दरवाढीचा निषेध हलगी वाजवुन आणि घोषणा देऊन नोंदवण्यात आला.

 " सस्ती दारु,महंगा तेल " "वा रे मोदी,तेरा खेल..."

या घोषणेने सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष चांगलेच वेधुन घेतले.अदानी,अंबानीचं भलं करणाऱ्या मोदी सरकारला सर्वसामान्यांचं भलं करण्याचं विसर पडलाय असा सुर यावेळी होता. अच्छे दिन आनेवाले है ! हे स्वप्न पाहताना पहले के दिन अच्छे थे म्हणण्याची पाळी आली हे मात्र नक्की असे याप्रसंगी राष्ट्रवादी कांग्रेसचे नेते पंडीत धुमाळ,सामाजिक न्याय विभागाचे लक्ष्मण कांबळे,युवकचे तालुकाध्यक्ष उल्हास सुर्यवंशी,महेश चव्हाण,शहराध्यक्ष ईस्माईल लदाफ,हसनभाई चाऊस युवक शहराध्यक्ष धम्मानंद काळे महिला तालुकाध्यक्ष पानफुलताई पाटील,तालुका सरचिटणीस सलीम पठाण,सिद्दीक मुल्ला,दीपक पुंडे,रवी पाटील,अमर माने,ओम शिंदे इत्यादी पदाधिकारी व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments