पत्रकार शकील देशमुख यांना आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर
के वाय पटवेकर
शिरूर अनंतपाळ: तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष पत्रकार शकील रसुलसाब देशमुख उजेडकर यांना राजमाता जिजाऊ प्रतिष्ठान व मराठा सेवा संघातर्फे दिला जाणारा पत्रकारिता क्षेत्रातील जिल्हास्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे. जिजाऊ प्रतिष्ठानचे राज्याध्यक्ष प्रा. विवेक सुकणे व मराठा सेवा संघ उदगीरचे तालुकाध्यक्ष प्रदीप ढगे यांनी पत्राद्वारे पुरस्काराची घोषणा केली आहे. जिजाऊ प्रतिष्ठान उदगीर व मराठा सेवा संघ शाखा उदगीर तर्फे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना हा पुरस्कार दिला जातो. दि.२४ ऑक्टोबर रविवार रोजी रघुकुल मंगल कार्यालय उदगीर येथे सकाळी ११.३० वाजता विविध मान्यवरांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. पत्रकार देशमुख यांना पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.
0 Comments