अनंत तुळजाराम नाईक विद्यालयाचे नवोदय परीक्षेत उत्तुंग यश
नळेगाव:( प्रतिनिधी/बाळासाहेब बरचे ) येथील अनंत तुळजारम नाईक विद्यालयाने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी यशाची परंपरा कायम ठेवत 5 वी नवोदय परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. इयत्ता 5 वी मधून 3 विद्यार्थी पात्र ठरले. हुडगे श्रीशैल्य दत्तात्र्य, कोळी विश्वनाथ दशरथ, सावंत श्रुती भानुदास या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेतील सहशिक्षक पतंगे, वाघमारे, काळे यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थांचे संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला व मार्गदर्शक शिक्षकांचे नवनीत शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे सचिव डॉ. माणिकरावजी पाटील, अध्यक्ष माधवरावजी पाटील साहेब, सहसचिव सूर्यकांतजी रेड्डी , शिवणगे, जीवनराव बिराजदार उमाकांत देवशटवार, अमर पाटील, अभिजीत पाटील, कैलास रेड्डी, डॉ.प्रशांत शिरुरे व सर्व सन्माननीय संचालक मंडळ, शाळेचे मुख्याध्यापक रेड्डी जे.जी.व सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

0 Comments