Latest News

6/recent/ticker-posts

सावरगाव येथे विविध उपक्रमातून ज्येष्ठ नागरिक दिन साजरा

सावरगाव येथे विविध उपक्रमातून ज्येष्ठ नागरिक दिन साजरा 


देवणी:( प्रतिनिधी/विक्रम गायकवाड़ ) 75 व्या स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सव वर्षा निमित्य विविध उपक्रम घेण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद लातूर अभिनव गोयल यांनी दिलेल्या सूचनेस अनुसरून आज दि. 01ऑक्टोबर 2021 रोजी जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्याने  महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियाना मधे समाविष्ट ग्रामपंचायत सावरगाव येथील आरोग्य उपकेंद्रामधे रक्तदाब, मधुमेह इत्यादींची तपासणी शिबिर घेण्यात आले. तसेच इतर आजाराविषयी माहिती सांगण्यात आली. तसेच ग्रामपंचायत कार्यालय सावरगाव मार्फत गावांमध्ये ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्राची स्थापना करण्यात आली. यावेळी ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार सन्मान करण्यात आला. ज्येष्ठ नागरिक हा समाजाचा महत्वपूर्ण घटक असल्याने त्यांचे राहणीमान सुसह्य व्हावे, आरोग्याच्या सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात, त्यांच्या पालन पोषणाची जबाबदारी व अधिकार यांची जाणीव समाजाला आणि त्यांच्या पाल्यांना व्हावी, म्हणून यावेळी उपस्थित आदरणीय सहाय्यक गटविकास अधिकारी कांबळे, विस्तार अधिकारी कट्टेवार गावचे ग्रामसेवक सगर यांनी शासनाने ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी आई वडील, ज्येष्ठ नागरिकांच्या चरितार्थ व कल्याणासाठी ज्या विविध सुविधा व बनवलेल्या कायद्यांबद्दल सखोल मार्गदर्शन केले. यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी व्ही एस कांबळे, विस्ताराधिकारी(प) ए डी कट्टेवार, ग्रामसेवक एम व्ही सगर,C.H.O. फरा मॅडम, सिस्टर एस आर बिरादार, आशा कार्यकर्ती यु आर स्वामी, एम एस बोबडे व VSTF तालुका समन्वयक सागर तापडिया आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments